घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्राचा १४ कोटींचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:16 AM2019-09-05T01:16:32+5:302019-09-05T01:16:40+5:30

मीरा-भार्इंदर, भिवंडीला अनुदान : शहर स्वच्छतेसाठी आणखी एक पाऊल

6 crore contribution to the center for solid waste management | घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्राचा १४ कोटींचा हातभार

घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्राचा १४ कोटींचा हातभार

Next

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील ९ शहरांचे १७२ कोटी ५१ लाख ९९ हजार ४४९ रुपयांचे प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने केंद्राकडे पाठविले असून त्यापैकी केंद्राने आपल्या अनुज्ञय हिश्श्याचे ५८ कोटी ४९ लाख ९०७ रुपयांपैकी पहिल्या हप्ता म्हणून २९ कोटी २४ लाख ५० हजार ४५३ रुपयांचा निधी नुकताच वितरीत केला आहे. यातील ठाणे जिल्ह्यातील मीरा-भार्इंदर आणि भिवंडी महापालिकेच्या वाट्याला १४ कोटी सात लाख ४८ हजार २८ रुपये आले आहेत. उर्वरित सहा शहरांमध्ये अहमदनगर, अकोला या दोन महापालिकांसह बारामती, कळंब, जत आणि श्रीवर्धन या चार नगरपालिकांचा समावेश आहे.

केंद्राकडून मिळालेल्या या निधीतून उपरोक्त ९ शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थाना आपला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून आपले शहर स्वच्छ ठेवायचे आहे. देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करून नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच देशातील सर्व शहरांना स्वच्छतेची सवय लागून या शहरामधील नागरिकांना घरगुती शौचालयांची सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्राने ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ सुरू केले आहे. त्याआधारावर ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान ’ राबवण्यात येत आहे.

मीरा-भार्इंदरला आठ कोटी
मीरा-भार्इंदरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ४५ कोटी ६८ लाख ३० हजार ६६३ रुपयांचा असून त्यात केंद्राकडून १५ कोटी ९८ लाख ९० हजार ७३२ रुपये अनुदान मिळणार असून आता त्यातील सात कोटी ९९ लाख ४५ हजार ३६६ रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

भिवंडीला सहा कोटी आठ लाख
भिवंडी शहराचा प्रकल्पाची किंमत ३४ कोटी ७४ लाख ४३ हजार ७८४ रुपये असून त्यात केंद्राकडून मिळणारा अनुज्ञय हिस्सा १२ कोटी १६ लाख पाच हजार ३२४ रुपये असून आता त्यापैकी सहा कोटी आठ लाख दोन हजार ६६२ रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

Web Title: 6 crore contribution to the center for solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.