58,000 citizen home quarantine | ५८ हजार नागरिक होम क्वारंटाइन

५८ हजार नागरिक होम क्वारंटाइनलोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागला आहे. परंतु, यामध्ये कोणतीही लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र, रुग्णांच्या संपर्कात असलेले, तसेच प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच आजघडीला ठाणे  जिल्ह्यात तब्बल ५८ हजार नागरिक होम क्वॉरंटाईन असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. परंतु, रुग्णांच्या संपर्कातील लोकांची संख्याही काही प्रमाणात वाढत असून, यामध्ये कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक २३ हजार ७५८ नागरिकांचा समावेश आहे. 
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस प्रशासन अहोरात्र कार्यरत होते. तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. रुणालयातील बेड्सदेखील अपुरे पडत होती. त्यामुळे बेड्सअभावी रुग्णांचे होणारे हाल या सर्व बाबींचा विचार करता आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या. त्यानुसार सौम्य लक्षणे आढळणारे रुग्ण, ज्यांना त्रास होत नसेल अशा नागरिकांना आरोग्य विभाग होम क्वारंटाईनचा सल्ला देत होता. त्यावेळी होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात गेली होती. 


खासदार शिंदे यांना कोरोनाची लागण

कल्याण : कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
खा. शिंदे यांनाही त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी उल्हास नदी प्रदूषणाच्या आंदोलनास भेट दिली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: 58,000 citizen home quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.