ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५३३ रुग्ण ; १२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:05+5:302021-07-09T04:26:05+5:30

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी ५३३ जणांची वाढ झाली असून १२ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले. जिल्ह्यात आजपर्यंत ...

533 new corona patients in Thane district; 12 deaths | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५३३ रुग्ण ; १२ मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५३३ रुग्ण ; १२ मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी ५३३ जणांची वाढ झाली असून १२ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले. जिल्ह्यात आजपर्यंत ५ लाख ३६ हजार ४४९ रूग्णांसह १० हजार ७८९ मृतांची नोंद झाली आहे.

ठाणे परिसरात १२० नवे रुग्ण आढळून आले. दोन बाधित दगावले. कल्याण डोंबिवली शहरात १३५ नवे रुग्ण आढळले तर दोन मृताची नोंद झाली. उल्हासनगरला १२ रुग्णांच्या वाढीसह तीन मृत्यू झाले. भिवंडीत दिवसभरात ५ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. मीरा भाईंदरला ३० नव्या रुग्णांची वाढ झाली. मात्र मृतांची नोंद नाही.

..........

वाचली

वाचली

अंबरनाथला तीन रुग्णांच्या वाढी झाली. मात्र मृत्यू नाही. येथील रुग्ण संख्या आता १९ हजार ८६१ झाली असून ५१७ मृतांची नोंद झाली आहे. कुळगाव बदलापूरमध्ये २४ रुग्णांची भर पडली आहे. गुरूवारी एकही मृत्यू नाही. आता येथील २० हजार २७४ रुग्णांसह ३४७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये ६० रुग्ण आढळून असून एकही मृत्यू नाही. या परिसरात आजपर्यंत ३९ हजार ७६८ रुग्णांची वाढ होऊन १ हजार १९० मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 533 new corona patients in Thane district; 12 deaths