मीरा रोडच्या बारवरील छाप्यात ५२ अटकेत
By Admin | Updated: May 10, 2016 02:01 IST2016-05-10T02:01:05+5:302016-05-10T02:01:05+5:30
शीतलनगर परिसरातील दोन आॅर्केस्ट्रा बारवर छापे टाकून पोलिसांनी अश्लील चाळे करणाऱ्या १६ बारबालांसह ५२ जणांना अटक केली.

मीरा रोडच्या बारवरील छाप्यात ५२ अटकेत
मीरा रोड : शीतलनगर परिसरातील दोन आॅर्केस्ट्रा बारवर छापे टाकून पोलिसांनी अश्लील चाळे करणाऱ्या १६ बारबालांसह ५२ जणांना अटक केली.
बिंदिया आणि ऐश्वर्या या बारमध्ये बारबाला व ग्राहकांचे अश्लील चाळे चालत असल्याची माहिती उपअधीक्षक सुहास बावचे यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांच्या पथकाने रविवारी रात्री छापे टाकले.
त्यात बिंदियामधून चार बारबाला, २२ ग्राहक, तीन
कर्मचारी तर ऐश्वर्या बारमधून १२ बारबाला, आठ ग्राहक, तीन कर्मचारी अशा एकूण ५२ जणांना अटक करण्यात आली.