५० हजारांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:17+5:302021-02-24T04:41:17+5:30
-------------------------------------- दुचाकीची ठोकर डोंबिवली : भरधाव दुचाकीची ठोकर बसल्याने नितीन चव्हाण हा पादचारी जखमी झाल्याची घटना कल्याण-शीळ रोडवर रविवारी ...

५० हजारांची रोकड लंपास
--------------------------------------
दुचाकीची ठोकर
डोंबिवली : भरधाव दुचाकीची ठोकर बसल्याने नितीन चव्हाण हा पादचारी जखमी झाल्याची घटना कल्याण-शीळ रोडवर रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली. यात चव्हाण यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूस दुखापत झाली आहे. या प्रकरणी दुचाकीचालक सतीश कुबडे याच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------
रिक्षा चोरीला
कल्याण : रिक्षाचालक रईस शेख यांनी त्यांची रिक्षा पश्चिमेतील झोझवाला पेट्रोल पंपाच्या गेटवर उभी केली होती. तेथून रिक्षा चोरीला गेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------
६१ हजारांची घरफोडी
डोंबिवली : पूर्वेतील सावरकर रोड परिसरातील सोमनाथ सोसायटी येथे राहणारे राजन लाकुळे यांच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून लॅपटॉप व इतर साहित्य असा ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------
९३ हजारांचा गंडा
डोंबिवली : गतिमंद मुलीला बरे करून देतो, असे प्रलोभन दाखवून दोन भामट्यांनी ९३ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पी ॲण्ड टी कॉलनी येथे घडली. या प्रकरणी लक्ष्मी धुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------
सोनसाखळी चोरी
डोंबिवली : एमआयडीसीतील मिलापनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ८० वर्षीय सुहासिनी परांजपे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------