आकाशात उडवले ५००० भगवे फुगे आणि २५ हजार पेढ्यांचे केले वाटप
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 22, 2024 18:02 IST2024-01-22T18:01:56+5:302024-01-22T18:02:40+5:30
अयोध्याच अवतारणार अशी वातावरण निर्मिती या परिसरात झाली होती. या प्रसंगी कारसेवक आमदार संजय केळकर यांनी श्री प्रभूरामाबद्दल विचार प्रकट करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.

आकाशात उडवले ५००० भगवे फुगे आणि २५ हजार पेढ्यांचे केले वाटप
ठाणे : चंदनवाडी परिसरात भारतीय जनता पार्टी ठाणे शहरचे उपाध्यक्ष, स्वामी भक्त महेश कदम यांच्यावतीने प्रभू श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आज चंदनवाडी चौकात करण्यात आले. यावेळी श्रीराम लिहीलेले ५००० भगवे फुगे आकाशत उडवण्यात आली.
अयोध्याच अवतारणार अशी वातावरण निर्मिती या परिसरात झाली होती. या प्रसंगी कारसेवक आमदार संजय केळकर यांनी श्री प्रभूरामाबद्दल विचार प्रकट करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.
राममंदिर सोहळा याची देही, याची डोळा बघता आला यापेक्षा मोठा आनंद नाही असे ते म्हणाले. १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना होताच, फटाक्यांची अतिशबाजी, आकाशात भगवे फुगे सोडून सुमारे २५ हजार पेढे ठाणे शहरात वाटप करण्यात आले.