गाळा देण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

By Admin | Updated: July 3, 2017 04:51 IST2017-07-03T04:51:11+5:302017-07-03T04:51:11+5:30

गाळा देण्याच्या नावाखाली कळव्यातील पोपट चौधरी यांची सतीश रिचार्ला याच्यासह तिघांनी ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी

50 lakh cheats in the name of the donation | गाळा देण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

गाळा देण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गाळा देण्याच्या नावाखाली कळव्यातील पोपट चौधरी यांची सतीश रिचार्ला याच्यासह तिघांनी ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कळव्याच्या जुन्या मुंबई हाय वे रोडवरील दत्तवाडीतील साईराम सोसायटीतील रहिवासी चौधरी याने सतीश रिचार्ला यांच्या मध्यस्थीने गाळामालक शर्मिला कपोते आणि तिचा भाऊ हिरोज कपोते यांना त्यांचा गाळाखरेदीसाठी ३० लाख रोख आणि आरटीजीएसमार्फत २० लाख असे ५० लाख रुपये दिले.
जैनम आर्केडच्या तळमजल्यावर शॉप क्रमांक-४ मध्ये झालेल्या गाळाखरेदीच्या या व्यवहारानंतर चौधरी यांना सतीश आणि कपोते बंधू-भगिनीने गाळाही नावावर केला नाही आणि पैसेही परत केले नाहीत. अखेर, या प्रकरणी त्यांनी १ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक तुकाराम पोवळे अधिक तपास करीत आहेत. लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येणार आहे.

Web Title: 50 lakh cheats in the name of the donation