शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ठेक्याचे ५० सुरक्षा रक्षक आता सुरक्षारक्षक मंडळाकडून पुन्हा पालिका सेवेत

By धीरज परब | Updated: January 14, 2024 14:42 IST

आणखी १५० सुरक्षा रक्षक ना मिळणार रोजगार 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत ठेक्यावर असणाऱ्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कमी केल्या नंतर स्थानिकांवर बेरोजगारीची ओढवलेली संक्रांत दूर करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी प्रयत्न चालवले होते . त्यातूनच ठेक्याच्या अनेक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळा तर्फे नोंदणी आदी कार्यवाही करून पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षक पुन्हा पालिका सेवेत दाखल झाले आहेत . 

राज्य शासनाचे पूर्वी पासूनच आदेश होते कि , सुरक्षा रक्षक हे शासनाच्या मान्यता प्राप्त सुरक्षा मंडळाचे नेमण्यात यावेत . परंतु मीरा भाईंदर महापालिकेने असेच अनेक नगरसेवक व काही वादग्रस्त राजकारणी आदींनी अर्थपूर्ण हेतून सातत्याने शासन आदेशाचे उल्लंघन करत खाजगी ठेकेदारा मार्फत सुरक्षा रक्षक घेतले असे आरोप होत होते . प्रत्यक्षात कमी सुरक्षा रक्षक असणे , त्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन , भत्ते न मिळणे आदी अनेक कारणांनी आरोप होत होते  . 

तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाच्या मान्यतेचे असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेऊन काही राजकारणी यांना धक्का दिला . त्या नंतर आलेले आयुक्त संजय काटकर यांनी तर ठेकेदारालाच स्वतःहून काम बंद करण्यास भाग पाडले . कारण सदर ठेकेदार अनेक वर्षां पासून केवळ मुदतवाढीवर असल्याने तसेच विविध कारणांनी कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा होती . 

पालिका सेवेत  मे. सैनिक इंटेलिजन्स अँड सेक्युरिटी प्रा.लि. मार्फत असलेल्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कंत्राट बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला . त्यात स्थानिक सुरक्षा रक्षक सुद्धा संख्येने नाईक होते . दरम्यान सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासह पुढील कार्यवाही बारगळली . 

दुसरीकडे सुरक्षा रक्षकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता ठेकेदार व प्रशासनाने परस्पर सुरक्षा रक्षक कमी केल्याने अनेक स्थानिकांवर बेरोजगारीची पाळी आली . त्यांनी आमदार गीता भरत जैन यांच्याकडे नोकरी मिळावी म्हणून अर्ज केले . आ . जैन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा चालवला होता . पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेण्याची तयारी केल्याने स्थानिकांना संधी मिळणार नाही म्हणून त्यास आ . जैन यांनी विरोध केला . 

अखेर स्थानिक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी करून लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेण्यात यावे ह्या मागणीवर उपमुख्यमंत्री व आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली . त्यामुळे आता स्थानिक बेरोजगार झालेल्या ५० सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळा तर्फे महापालिकेत पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे .

पुन्हा पालिका सेवेत रुजू झालेल्या सुरक्षा रक्षकांनी आ जैन यांची भेट घेऊन आभार मानले .  महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन चे संयुक्त सरचिटणीस ऍड . अजिंक्य भोसले आदी उपस्थित होते . पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळाला असून आणखी १५०  सुरक्षा रक्षकांना सुद्धा टप्या टप्याने पुन्हा सेवेत घेतले जाईल असे आ . जैन यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर