शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणीवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:12 IST

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीला तिच्याच एका नातेवाईक असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीला तिच्याच एका नातेवाईक असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पीडित तरुणी आणि विश्वकर्मा हे दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख आहे. याच ओळखीतून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. तोही मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील आहे. याच कारणामुळे त्यांची अधिक जवळीक आली. याचा त्याने गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर २०१२ पासून नवी मुंबईतील दिघा येथील ईश्वरनगर तसेच दिवा येथील त्याच्या घरी तसेच लोकमान्यनगर येथील तिच्या घरी आणि मुलुंड येथील एका लॉजवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार २०१२ ते ६ जुलै २०१७ पासून सुरू होता. लग्नाचे नाव काढल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून लवकरच लग्न करणार असल्याचे तिला सांगायचा. पुढे शरीर संबंध ठेवण्यासाठी तो धमकावत होता. कुठे वाच्यता केल्यास बदनामी करण्याचीही तिला तो धमकी देत होता. तरीही तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तो ठाणे जिल्ह्यातून पसार झाला.अखेर आपली मानसिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने ५ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दीपकविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आरोपी ठाण्यातून पसार झाला असून त्याला शोधण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एस. आर. अडसुळे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 

टॅग्स :thaneठाणेMolestationविनयभंग