५ महाविद्यालयांच्या तुकड्या वाढणार

By Admin | Updated: June 28, 2017 03:18 IST2017-06-28T03:18:12+5:302017-06-28T03:18:12+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विविध महाविद्यलायांमधील नवीन अतिरिक्त तुकड्यांना

5 colleges will grow | ५ महाविद्यालयांच्या तुकड्या वाढणार

५ महाविद्यालयांच्या तुकड्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विविध महाविद्यलायांमधील नवीन अतिरिक्त तुकड्यांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी दिली आहे. नुकत्याच निघालेल्या परिपत्रकानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ५ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त तुकड्यांना ही मंजुरी मिळाली असून, ही पाचही महाविद्यालये कल्याण-डोंबिवलीमधील आहेत.
राज्यभरातील विविध महाविद्यालये आपल्या महाविद्यालयात अतिरिक्त तुकड्यांसाठीचे प्रस्ताव दरवर्षी शासनाकडे पाठवतात. त्याची योग्य तपासणी करून तुकड्यांना मंजुरी दिली जाते. यंदाच्या वर्षासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत २९ महाविद्यालयांमध्ये विविध शाखांच्या तुकड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील ४ तर डोंबिवलीतील एका महाविद्यालयात अतिरिक्त तुकड्यांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी मिळाली आहे.
बिर्ला कॉलेजमध्ये एम.कॉम (अ‍ॅडव्हान्स अकांंटींग अ‍ॅन्ड आॅडिटिंग ), बी.कॉम (अकांंउंन्टिंग अ‍ॅन्ड फायनान्स), बी.एम.एस, बी.एस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), के.एम.अग्रवाल कॉलेजमध्ये बी.कॉम (अकांंउंन्टिंग अ‍ॅन्ड फायनान्स), जीवनदीप शैक्षणिक संस्था पाई संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बी.कॉम आणि बी.एस्सी या अतिरिक्त तुकड्या असणार आहेत. लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालयात एम. कॉम (अ‍ॅडव्हान्स अकांउंटन्सी) आणि डोंबिवलीतील दि साऊथ इंडियन असोसिएशनचे द.एस.आय.ए कॉलेज आॅफ हायर एज्युकेशनमध्ये बी.कॉम, बी.कॉम (बँकिंग अ‍ॅन्ड इन्शुअरन्स), बी.एस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बी.एम.एस या शाखांच्या अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी मिळाली आहे.
याचबरोबर नवी मुंबईतील एका तर पालघर जिल्ह्यातीलही ५ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त तुकड्या सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Web Title: 5 colleges will grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.