२५७ किलो वजनाच्या ५ बाइक १५० वेळा नेणार पोटावरून; ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 4, 2023 16:59 IST2023-05-04T16:57:33+5:302023-05-04T16:59:04+5:30
मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले धायगुडे कराटेत चार वेळा ब्लॅक बेल्ट असून धायगुडे यांनी गिनीज बुक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

२५७ किलो वजनाच्या ५ बाइक १५० वेळा नेणार पोटावरून; ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम
ठाणे : काही माणसे झपाटलेली असतात... जगावेगळे काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो... असाच ध्यास घेतलेले पंडित धायगुडे येत्या रविवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत. स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी येत्या रविवारी ७ मे २०२३ रोजी पुन्हा एकदा ठाणे पूर्व येथील धर्मवीर मैदानात २५७ किलो वजनाच्या पाच बाइक लागोपाठ १५० वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम करणार आहे.
या विक्रमाकरिता २००९ पासून तयारी करत असलेल्या धायगुडे यांनी यापूर्वी २५७ किलो वजनाच्या दोन बाइक लागोपाठ १२१ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम केला होता. मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले धायगुडे कराटेत चार वेळा ब्लॅक बेल्ट असून धायगुडे यांनी गिनीज बुक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. गिनीज बुकने त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले आहे. ठाणे पूर्व येथील धर्मवीर मैदानात येत्या रविवारी ते प्रात्यक्षिक सादर करून त्याचा व्हिडीओ गिनीज बुकला पाठवणार असून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.