टीडीसीसीच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:12+5:302021-03-23T04:43:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची पंचवार्षिक निवडणूक ३० मार्च रोजी आहे. या ...

टीडीसीसीच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची पंचवार्षिक निवडणूक ३० मार्च रोजी आहे. या बँकेचे सहा संचालक बिनविरोध विजयी झाले आहेत. आता शिल्लक राहिलेल्या १५ संचालकांच्या निवडणुकीसाठी ४६ इच्छुक अंतिम रिंगणात आहेत. सोमवारी शेवटच्या दिवसांपर्यत ४७ जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. सहकार पॅनल व महाविकास परिवर्तन पॅनलच्या नेतृत्वाखाली या बँकेचा निवडणूक प्रचार आता रंगणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या या टीडीसीसी बँके निवडणुकीसाठी १०५ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी सहा जणांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ते सहा संचालक बिनविरोध विजयी झाले आहेत. तर या उमेदवारांच्या छाननीत आठ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. आता बँकेच्या १५ संचालकांच्या निवडणुकीसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कु:हाडेदेखील त्यांच्या सात प्रतिस्पर्धी उमेदवारांना तोंड देत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे ४६ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला.
राज्यभरातील सहकारमधील दिग्गजांचे बँकेच्या या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी एकत्र येऊन त्यांचे पुरस्कृत उमेदवार दिले आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या उर्वरित सहका:यांचे सहकार पॅनल तयार केल्याचे त्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे महाविकास परिवर्तन पॅनल असल्याचे विद्यामान संचालक सुभाष पवार व बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले.
.........