अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 10:07 PM2022-05-04T22:07:08+5:302022-05-04T22:07:13+5:30

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गावात येणार आहे.

44 crore water supply scheme approved for 44 villages in Ambernath An Kalyan taluka | अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

googlenewsNext

ठाणे- अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील ४४ गावांमध्ये तब्बल ४४ कोटी 34 लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. यात अंबरनाथ मधील २७ तर कल्याण तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये नळाद्वारे  पाणी  पुरवठा कधी झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना डावरे खोदून पाणी प्यावे लागत होते. अखेर केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गावात येणार आहे.

मलंग गड, नेवाळी,चिरड,पोशिर,कुशिवली, मांगरूळ असा विविध गावातील गावकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू होणार असून १८ महिन्यात काम पूर्ण करून गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Web Title: 44 crore water supply scheme approved for 44 villages in Ambernath An Kalyan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.