२ वर्षांत ४०५ बालमृत्यू
By Admin | Updated: September 3, 2015 23:06 IST2015-09-03T23:06:54+5:302015-09-03T23:06:54+5:30
मोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. कुपोषणाबरोबरच मोखाडा तालुक्यात बालमृत्यंूचे प्रमाणही अधिक असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते

२ वर्षांत ४०५ बालमृत्यू
रवींद्र साळवे, मोखाडा
मोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. कुपोषणाबरोबरच मोखाडा तालुक्यात बालमृत्यंूचे प्रमाणही अधिक असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. दोन वर्षांत मोखाड्यात ४०५ बालमृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोखाडा एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांतर्गत येणाऱ्या १७८ मूळ अंगणवाड्या व ५१ मिनी अंगणवाड्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सात बीटमध्ये एप्रिल २०१३ ते जून २०१५ अखेरपर्यंत ३४ बालकांच्या मृत्यूची नोंद शासनदरबारी सापडते.
कुपोषण निर्मूलन तसेच गर्भवतींच्या आहारावर कोट्यवधी रु. खर्च होऊनही या उपाययोजनांचा पुरता फज्जा उडाल्याचे या बालमृत्यूंमुळे समोर आले आहे. तरीदेखील, याला आळा घालण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केलेली नाही. ८५ हजार लोकसंखेच्या मोखाडा तालुक्यासाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. तर, गर्भवतींची तपासणी, त्यांना दिला जाणारा सकस आहार, याचे मार्गदर्शनही वेळेवर मिळत नाही. यामुळे सरकारी यंत्रणेमार्फत येणारा लाखोंचा निधी कुठे आणि कसा जातो, हा संशोधनाचा विषय बनला आहे.