शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

ठाण्यात चार हजार परवानाधारक शस्त्र झाली म्यान, ५९ बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: November 19, 2024 22:30 IST

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टाेबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे तसेच पोलिसांचा मनाई आदेशही लागू असल्यामुळे मतदान प्रक्रीया शांततेत पार पडण्यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील चार हजार ४५२ परवानाधारक शस्त्र धारकांपैकी तब्बल तीन हजार ८०५ शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली आहेत. तर ३० शस्त्रांचा परवाना रद्द झाल्यामुळे ती पोलिसांकडे जमा झाली. त्याचबरोबर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ५९ बेकायदेशीर शस्त्रे आणि ८५ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी मंगळवारी दिली.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टाेबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर पोलिस ठाणे पातळीवर विशेष अभियानांतर्गत कोंबिंग ऑपनेशन, ऑपरेशन ऑल आऊट आदी विविध मोहिमा राबवून आतापर्यंत ५९ गावठी कट्टे आणि रिव्हॉल्व्हर तसेच चाकू आणि सुरे अशी २५२ हत्यारे जप्त करुन संबंधितांवर कडक कारवाई केली आहे.

मतदान कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परवानाधारक चार हजार ४५२ पैकी तीन हजार ८०५ रिव्हॉल्व्हरसारखी शस्त्रे पोलिसांकडे जप्त झाली. यातून धोका असलेले नामांकित बिल्डर, डॉक्टर आणि काही राजकीय पदाधिकारी अशा ४६४ जणांना या मनाई आदेशातून वगळले आहे.गेल्या महिनाभरात सुमारे १३ हजार लीटर बेकायदेशीर देशी, विदेशी आणि गावठी दारु जप्त केली. याशिवाय, गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे एक लाख ४५ हजार ३२० लीटर रसायन नाश केले आहे. त्याचबरोबर ६५ किलोग्राम गांजा, एमडी आणि एक कोटी दोन लाख ७२ हजार २१८ रुपयांचा गुटखाही जप्त केला आहे.नाकाबंदीमध्ये नऊ कोटी १३ लाखांची रोकड जप्त -

सनिक पोलिस आणि निवडणूकीसाठी सपन केलेले एसएसटी तसेच एसएसटी पथकामार्फत आचारसंहिता लागू झाल्यापासून नऊ कोटी १३ लाख ७१ हजार ६०० रुपये इतकी बेहिशोबी रोकड तसेच १३ लाख २६ हजार ३७७ रुपयांचे मौल्यवान सोने आणि चांदी जप्त केली आहे.‘‘ निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पडावी, यादृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना केली आहे. पोलिस यंत्रणा सुसज्ज आहे. सर्व नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा.’’ आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे शहर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी