उल्हासनगरात ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला अटक
By सदानंद नाईक | Updated: November 5, 2024 19:16 IST2024-11-05T19:16:13+5:302024-11-05T19:16:54+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

उल्हासनगरात ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला अटक
उल्हासनगर : कॅम्प नं -३, एका इमारतीमध्ये वॉचमनचे का करणाऱ्याच्या ४ वर्षाच्या चिमुडीवर त्याच्या मित्रानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं -३, दसरा मैदान परिसरात एका इमारती मध्ये वॉचमनचे काम करणारे पती-पत्नी काही कामानिमित्त घरा बाहेर गेले होते. तर वॉचमनची ४ वर्षाची मुलगी घरात झोपली होती. त्यावेळी वॉचमनचा परप्रांतीय फ़ुगे विकणारा मित्र घरी आला. तोही दिवसाला इमारतीचे वॉचमन म्हणून काम करतो. त्याने मुलगी एकटी असल्याचे पाहून लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, शेजारच्या घरातील रहिवाशांना संशय आल्यानं त्यांनी बंद दरवाजा उघडला असता मुलगी रडत असल्याचं दिसल. इमारतीतील रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देऊन आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित मुलीची मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, तपासणी अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यवर्ती पोलिसांनी आरोपीला अटक केली. अत्याचाराची घटना ३ दिवसापूर्वी घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तर मुलीवर अपचार करून आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याचे अवताडे म्हणाले.