शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

मुंब्र्यातून PFI च्या ४ कार्यकर्त्यांना अटक, महाराष्ट्रातही छापेमारी सुरूच

By जितेंद्र कालेकर | Updated: September 27, 2022 11:33 IST

महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव आणि मुंबईतील मुंब्र्यातून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

ठाणे : सध्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. यातच मंगळवारी सकाळच्या सुमारास तब्बल 7 राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दरम्यान जवळपास 170 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 13 राज्यांत छापे टाकत 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव आणि मुंबईतील मुंब्र्यातून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मुंब्र्यातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या चार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-1, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता विरोधी पथक,  युनिट-5 आणि झोन-1च्या पथकाने पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पहाटेच्या सुमारास राबविलेल्या संयुक्त कारवाईत  अटक केली आहे. मुंब्रा येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वरील कारवाईत समाज विघातक कृत्य  करणाऱ्या आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्याच्याविरुद्ध ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, सध्या पोलीस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात तपास करत आहेत. हिंसक निदर्शनांच्या नियोजनासंदर्भात इनपुट मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :mumbraमुंब्राthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस