३८८ अंगणवाड्या हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: November 9, 2016 03:44 IST2016-11-09T03:44:31+5:302016-11-09T03:44:31+5:30

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत सुरु असलेल्या ३८८ अंगणवाड्या अद्यापही शासकीय जागेच्या प्रतिक्षेत आहेत

388 awaiting the auspicious ground | ३८८ अंगणवाड्या हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत

३८८ अंगणवाड्या हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत

पंकज रोडेकर, ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत सुरु असलेल्या ३८८ अंगणवाड्या अद्यापही शासकीय जागेच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये १२१ अंगणवाड्या या ठाणे तालुक्यातील असून कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड आदी तालुक्यांमध्ये १५८ अंगणवाडयांना दुरु स्तीची प्रतिक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, भिवंडी -२, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, मुरबाड -२ आणि शहापूर तालुक्यात मिनी आणि मुख्य अंगणवाडया अशा १८५४ केंद्र सुरू आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बाल्यावस्था ही मानवाची वाढ व विकासाचा महत्त्वाचा टप्पा मनाली जाते. खऱ्या अर्थाने बालकांची शारिरिक, मानसिक व सामाजिक वाढ या टप्प्यात होते. मानवाच्या ८० टक्के बुद्धिमत्तेचा विकासही याच टप्प्यात होतो. त्यामुळे या अंगणवाड्यांना विशेष महत्त्व दिलेले आहे.
जिल्ह्यात शासनाकडून १८५४ अंगणवाडया चालविण्यात येतात. यामध्ये लोकसहभागाचीही मोलाची मदत घेतली जाते. मात्र असे असतानाही अजून ३८८ अंगणवाड्यांना शासनाची जागा उपलब्ध झालेली नाही. परिणामी त्या भाड्याच्या जागेत भरत आहेत. तर शासनाच्या अनेक ठिकाणच्या जागांवर अतिक्र मणे झाली असतानाही स्थानिक स्वराज्य संथांचे योग्य सहकार्य मिळत नसल्याने अंगणवाड्यांसाठी शासनाला स्वत:ची जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे भाड्याच्या जागेसाठी जिल्हा परिषदेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. दरम्यान, अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामांकडे जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्या कामांचे प्राधान्याने पाठपुरावा केला जात आहे.

Web Title: 388 awaiting the auspicious ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.