जिल्ह्यात ३७३ नवे रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:36+5:302021-06-23T04:26:36+5:30

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३७३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २८ हजार ...

373 new patients, 8 deaths in the district | जिल्ह्यात ३७३ नवे रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात ३७३ नवे रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३७३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २८ हजार ८६२ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ५३५ झाली आहे.

ठाणे शहर परिसरात ७३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख ३२ हजार ५०४ झाली आहे. शहरात मृत्यूची नोंद नाही. तर कल्याण - डोंबिवलीत ६७ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूची नोंद नाही. नवी मुंबईत ९४ रुग्णांची वाढ झाली असून ५ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ३ रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद नाही. भिवंडीत ४ बाधित असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ३६ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १५ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १९ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ६२ नवे रुग्ण वाढले असून एका मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३८ हजार ८५२ झाली असून आतापर्यंत १ हजार १६९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

Web Title: 373 new patients, 8 deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app