शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अकस्मात मृत्यूंच्या ३७० प्रकरणांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 19:22 IST

ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ते मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

ठाणे -  ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ते मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.  मनपा हद्दीत  एकुण दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्याकडून जानेवारी२०१७ ते डिसेबंर २०१७ या कालावधीत एकुण ४८६ मयत व्यक्तींच्याप्रकरणांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. त्यापैकी ११६प्रकरणांमध्ये यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत.370 मयत इसमांची यादी मयतांच्या मृत्यूचे कारण व नातेवाईक/खबर देणाऱ्याच्या नावासह खालील कार्यालयांमध्ये प्रसिध्द करणेत आलेली आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे संकेतस्थळावर (www.thane.nic.in), उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, ठाणे217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम), तहसिलदार कार्यालय, ठाणे  जिल्हा परिषद ठाणे समोर, स्टेशन रोड ठाणे, (प)

उपरोक्त ठिकाणी मयत इसमांच्या मृत्युबाबत/कारणाबाबत त्यांचे नातेवाईक, हितसंबंधित अथवा अन्य कोणासही संशय/तक्रार/हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे/साक्ष देणेची असल्यास संबंधितांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्या पासुन 07 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी ठाणे विभाग ठाणे, पत्ता- 217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे कार्यालयीन वेळेत हजर राहुन आपले म्हणणे तोंडी अथवा लेखी स्वरुपात सादर करावे. विहीत मुदतीत कोणाच्याही हरकती/तक्रार प्राप्त न झाल्यास या संदर्भात कोणाचीही हरकत नाही असे ग्राहय धरुन अकस्मात मृत्युबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील.

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे