शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या मुर्धा भागात कांदळवन, पाणथळमधील ३६ बांधकामे तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 20:56 IST

भार्इंदरच्या मुर्धा रेव आगर भागातील कांदळवन, पाणथळ व सीआरझेड बाधीत सरकारी जमीनीत पर्यावरणाचा रहास करुन बांधलेली सुमारे ३६ पक्की बांधकामं आज सोमवारी महापालिकेने महसुल विभागासह तोडण्याची कारवाई केली.

मीरारोड : भार्इंदरच्या मुर्धा रेव आगर भागातील कांदळवन, पाणथळ व सीआरझेड बाधीत सरकारी जमीनीत पर्यावरणाचा रहास करुन बांधलेली सुमारे ३६ पक्की बांधकामं आज सोमवारी महापालिकेने महसुल विभागासह तोडण्याची कारवाई केली. कायदे नियमातील तरतुदी तसेच सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर देखील मीरा भार्इंदरमध्ये कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रात काळदळवनाची कत्तल करुन भराव, बांधकामे केली जात आहेत.कांदळवन व पाणथळ तक्रार निवारण समिती मध्ये या बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने मांडला जात आहे. पालिकेत झालेल्या बैठकीत देखील पर्यावरणाचा रहास करुन बांधलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा निर्णय झाला होता. आयुक्त बी.जी.पवार, अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर, उपायुक्त दिपक पुजारी यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांनी मुर्धा येथील रेव आगर या सरकारी जमीनीतील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईबाबत तलाठी गणेश भुताळे यांना सातत्याने पत्रव्यवहार केला होता. परंतु कारवाईस विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती.आज सोमवारी दुपारी गोडसे यांनी सहकारी अधिकारी गोविंद परब, नरेंद्र चव्हाण, सुनिल यादव, जगदिश भोपतराव तसेच पालिका व पोलीस कर्मचारी, बाऊन्सर असा मोठा ताफा घेऊन कारवाईला सुरूवात केली. तलाठी भुताळे देखील उपस्थित होते. या ठिकाणी खारफुटीची मोठमोठी झाडं कापून त्यात डेब्रिसचा भराव करुन पक्की बांधकामे बांधण्यात आली . तर बांधकामां साठी कोबे तयार करण्यात आले. वीटांचा साठा देखील बांधकामासाठी केलेला होता. या बांधकामांना रीलायन्स कडुन वीज पुरवठा झालेला होता. पालिकेने देखील पक्का नाला बांधून खारफुटी नष्ट केली आहे. विशेष म्हणजे सरकारी जमीनींची सर्रास खरेदी विक्री केली जात आहे.दुपारपासून कारवाईला सुवात झाली. काही बांधकामं तोडली नाही तोच जेसीबीचे इंधन संपले. त्यामुळे पोकलेन मागवण्यात आला. पोकलेनच्या सहाय्याने बांधकामे पाडुन टाकण्यात आली. स्थानिक भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे व सभापती जयेश भोईर देखील या ठिकाणी आले. म्हात्रे ह्या तर , खारफुटीची झाडं कापुन बांधकामं केली आहेत. तक्रारी करुन देखील पालिका अधिकारी बांधकामे तोडत नाहीत. ज्यांना कर आकारणी झाली त्यांची बांधकामे तोडू नका असं सांगत होत्या.तर, या भागात अन्य नविन बांधकामं असून ती देखील तोडा अशी मागणी काही लोकं करत होती. ज्यांची घरं तोडण्यात आली त्या सबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे तलाठी भुताळे म्हणाले. तर महसुल विभाग सरकारी जमीनींवरील बांधकामे तोडण्यासाठी वेळ देत नसल्याने कारवाईस विलंब होत असल्याचे सुत्रांनी सांगीतले. तर बांधकामे तोडली असली तरी सदर ठिकाणचा भराव काढून पुन्हा खारफुटीची लागवड करावी तसेच पुन्हा बांधकामे होणार नाही याची खबरदारी घेतली जावी अशी मागणी जागरुक नागरीकांमधून होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक