शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात प्रधानमंत्री आवास योजनेतुन उभारली जाणार ३ हजार ५७८ परवडणारी घरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:51 IST

घरांच्या उभारणीसाठी ७२३ कोटी रुपयांची निविदा जाहीर; खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी, ३ हजार ५७८ घरांच्या बांधकामाची निविदा जाहीर केली. यासाठी ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपयाचा निधी निश्चित करण्यात आला. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी या योजनेबाबत दुजोरा दिला असून खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

उल्हासनगरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शहर पूर्वेतील संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथे गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला. या अंतर्गत ३ हजार ५७८ घरांच्या बांधकामासाठी निविदा जाहीर केली. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये असा निश्चित करण्यात आला. शहरातील गृहनिर्माणाची वाढती गरज लक्षात घेता, कमी उत्पन्न गटातील नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या घरांचे वाटप पात्र लाभार्थ्यांना शासकीय नियमांनुसार केले जाईल. 

शहरात विविध विकास प्रकल्प मार्गी लागले असून बहुतांश रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्याने वाहतुकीला गती मिळणार आहे. तसेच शहरातील अनधिकृत इमारतींचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर अनधिकृत इमारतींचा देखील पुनर्विकास करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आल्याने, हजारो कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. असे शिंदे यांच्या कार्यालयाकडून काढलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथे गृहप्रकल्प शहर पूर्वेतील संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथील भूखंडांवर १ हजार ७८९ आणि १ हजार ७८९ अशी एकूण ३ हजार ५७८ घरे निर्माण केली जाणार आहेत. या घरांसोबतच पक्के रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण जाळे, वीजपुरवठा व्यवस्था, समाजोपयोगी मूलभूत सुविधा, तसेच स्वयंपूर्ण वसाहतीसाठी आवश्यक सर्व नागरी सुविधा उभारण्यात येतील. या प्रकल्पा अंतर्गत सर्वेक्षण, मातीची चाचणी, आराखडा व नकाशे तयार करणे, वास्तू उभारणी, तसेच घरांच्या सोबतच सर्व आवश्यक अंतर्गत व बाह्य पायाभूत सुविधा तयार करण्याची जबाबदारी निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या कंत्राटदाराकडे सोपविण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 3,578 Affordable Homes to be Built in Ulhasnagar Under Housing Scheme!

Web Summary : Ulhasnagar to construct 3,578 affordable homes under the Pradhan Mantri Awas Yojana with ₹723.11 crore funding. The project aims to provide housing for economically weaker sections, with amenities and infrastructure included. Shrikant Shinde advocated for the project and redevelopment of unauthorized buildings.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर