ठाणे : कोपरी येथील जिओ स्टोअर्समधून सुमारे ३.५० लाख रुपयांचे मोबाइल फोन परस्पर विकून फसवणूक करणाºया रिलायन्सच्या एका कर्मचा-याविरुद्ध कोपरी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.मुलुंड येथे रिलायन्सचे जिओ स्टोअर्स असून तिथे फय्याज फिरोज सय्यद (वय २३) हा नोकरीला आहे. त्याने १२ आॅक्टोबर रोजी कोपरी येथील जिओ स्टोअर्समधून पाच मोबाइल फोन विकण्यासाठी घेतले. त्यामध्ये अॅपलच्या तीन फोनचा समावेश होता. रिलायन्सच्या जिओ स्टोअर्सना मोबाइल फोनविक्रीचे टार्गेट कंपनीकडून दिले जाते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिओ स्टोअर्स एकमेकांची मदत नेहमीच घेत असतात. याशिवाय, फय्याज रिलायन्सचा कर्मचारी असल्याने स्टोअर मॅनेजर फय्याजउल्ला हुमेरअली फैज यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला मोबाइल फोन विकण्यासाठी दिले. मात्र, त्याने फसवल्याने स्टोअर मॅनेजर हुमेरअली फैज यांनी गुरुवारी याप्रकरणी कोपरी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ करत आहेत.
३.५० लाखांचे मोबाइल परस्पर विकले, कर्मचा-याविरुद्ध गुन्हा : फोन विकून मिळालेली रक्कम परत दिलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:12 IST