फेसबुक फ्रेंण्ड रिक्वेस्टद्वारे ३५ हजारांची फसवणूक

By Admin | Updated: December 22, 2016 05:58 IST2016-12-22T05:58:17+5:302016-12-22T05:58:17+5:30

सोशल मीडियावरील फेसबुकद्वारे एका महिलेची मैत्री (फ्रेण्ड रिक्वेस्ट) स्वीकारणे खारेगावातील श्रमिष्ठा नागले (४५) या महिलेला

35 thousand fraud by Facebook friend request | फेसबुक फ्रेंण्ड रिक्वेस्टद्वारे ३५ हजारांची फसवणूक

फेसबुक फ्रेंण्ड रिक्वेस्टद्वारे ३५ हजारांची फसवणूक

ठाणे : सोशल मीडियावरील फेसबुकद्वारे एका महिलेची मैत्री (फ्रेण्ड रिक्वेस्ट) स्वीकारणे खारेगावातील श्रमिष्ठा नागले (४५) या महिलेला चांगलेच महागात पडले. आधी मैत्रीचे नाटक करून मार्स खान डेव्हिड फोन्गलोसा, रालटे आणि एरिक मायकल या तिघांनी पार्सलद्वारे गिफ्ट पाठवण्याचा बहाणा करून तिच्याकडून ३५ हजार रुपये उकळले. आणखी ९३ हजार रुपये उकळण्याच्या तयारीत असतानाच सावध झाल्याने कळवा पोलीस ठाण्यात तिने फसवणुकीची तक्रार दाखल केली.
कळवा, खारेगाव येथील कार्तिक व्हिला सोसायटीमध्ये राहणाऱ्या श्रमिष्ठा यांना एरिक मायकल याने मार्स खान डेव्हिड फोन्गलोसा तसेच रालटे यांच्याशी संगनमत करून एरिकच्या फेसबुक अकाउंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. समोरची व्यक्ती उच्चशिक्षित महिला असल्याचे भासवल्यामुळे तिच्याशी मैत्री स्वीकारून त्यांनी गप्पा सुरू केल्या. नंतर, व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटिंग सुरू करून त्यांचा विश्वास संपादन केला. आता तुम्हाला मोठ्या रकमेचे ४५ किलोग्रॅम वजनाचे गिफ्ट पार्सल पाठवत असल्याची त्या महिलेचा मित्र एरिकने बतावणी केली. त्यासाठी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे पार्सलच्या क्लिअरिंगसाठी ३५ हजार डेव्हिड यांच्या दिल्ली येथील बँक खात्यात भरण्यास सांगितले.
खात्यावर पैसे भरल्यानंतर पार्सल मिळेल, असे आमिष दाखवल्यामुळे त्यांनी ते भरले. हे पैसे भरल्यानंतर अ‍ॅण्टी टेररिस्ट सर्टिफिकेटसाठी ९३ हजार रुपये भरावे लागणार असल्याचे रालटे याने सांगितले. अर्थात, त्यांना कोणतेही पार्सल न देता त्यांची फसवणूक केली. (प्रतिनिधी)

Web Title: 35 thousand fraud by Facebook friend request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.