केडीएमसीमध्ये ३५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST2021-07-03T04:25:09+5:302021-07-03T04:25:09+5:30

कल्याण : स्वातंत्र्यसंग्रामसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या ...

35 people donated blood in KDMC | केडीएमसीमध्ये ३५ जणांनी केले रक्तदान

केडीएमसीमध्ये ३५ जणांनी केले रक्तदान

कल्याण : स्वातंत्र्यसंग्रामसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या भव्य रक्तदान महायज्ञांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेत गुरुवारी रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले.

रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महापालिका, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मुंबई डिव्हिजन, सुमन पुष्प फाउंडेशन, रोट्रॅक्ट क्लब कल्याण सेंट्रल, रोट्रॅक्ट क्लब बिर्ला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. या शिबिरास महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत, कर विभागाचे विनय कुळकर्णी, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी भेट दिली. या वेळी रोटरीचे डीजीएम मिलिंद कुलकर्णी, रोटेरियन ॲड. सुषमा पटेल, प्रोजेक्ट चेअरमन मयूर पोपट आदी उपस्थित होते.

फोटो-०२ कल्याण-रक्तदान

फोटो ओळ - रक्तदान शिबिरास केडीएमसी उपायुक्त पल्लवी भागवत यांनी दिली भेट.

----------------------

Web Title: 35 people donated blood in KDMC