शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 25 उमेदवारांचे 32 नामनिर्देशनपत्रे वैध, 11 अर्ज अवैध

By सुरेश लोखंडे | Updated: May 4, 2024 23:28 IST

या छाननी प्रक्रियेत  ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर  25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे.

ठाणे : जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया  पार पडली. या छाननी प्रक्रियेत  ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर  25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांनी एकूण 43 अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जांची शनिवार, दि. 4 मे 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे 25 ठाणे लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक श्री. जे. श्यामला राव (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 25 ठाणे लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी छाननी केली. 

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार :-1.    राजन बाबूराव विचारे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण 4 अर्ज)2.    मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारी – अपक्ष (एकूण 2 अर्ज)3.    डॉ. पियूष के. सक्सेना - अपक्ष 4.    झा सुभाषचंद्र - सरदार वल्लभभाई पार्टी5.    सुरेंद्रकुमार के. जैन - अपक्ष 6.    अर्चना दिनकर गायकवाड - अपक्ष7.    राहूल जगबीरस‍िंघ मेहरोलिया - बहुजन रिपब्ल‍िकन सोशालिस्ट पार्टी8.    चंद्रकांत विठ्ठल सोनावणे - अपक्ष9.    राजेंद्र रामचंद्र संखे - भारतीय जवान किसान पार्टी10.    राजीव कोंड‍िबा भोसले - अपक्ष11.    विजय ज्ञानोबा घाटे - रिपब्ल‍िकन बहुजन सेना12.    खाजासाब रसुलसाब मुल्ला - अपक्ष13.    उत्तम किसनराव तिरपुडे - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)14.    भवरलाल खेतमल मेहता - हिंदू समाज पार्टी15.    गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी - अपक्ष16.    संभाजी जगन्नाथ जाधव - अपक्ष17.    प्रमोद आनंदराव धुमाळ - अपक्ष18.    सिद्धांत छबन श‍िरसाट - अपक्ष19.    नरेश गणपत म्हस्के - शिवसेना (एकूण 4 अर्ज)20.    संतोष भिकाजी भालेराव - बहुजन समाज पार्टी21.    संजय मनोहर मोरे - अपक्ष22.    मुकेश कैलासनाथ तिवारी - भीमसेना23.    सावळे दत्तात्रय  सिताराम - अपक्ष24.    सलिमा मुक्तार वसानी - बहुजन महापार्टी 25.     इरफान इब्राहिम शेख - अपक्ष

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार:-1.    आतिकूर रेहमान शेख – भारतीय राष्ट्रीय पार्टी2.    अजय तुळशीराम मगरे- अपक्ष3.    अब्दुल रेहमान शकील खान – अपक्ष4.    जयदीप विनयकुमार कोर्डे – अपक्ष5.    संतोष रघुनाथ कांबळे – अपक्ष6.    प्रशांत रघुवीर अहिरवार – अपक्ष7.    जुबिन रज्जाक पटवे – अपक्ष8.    सुनील श‍िवाजी राठोड – राष्ट्रीय मराठा पार्टी9.    रामेश्र्वर सुरेश भारद्वाज – हिंदुस्थान मानव पक्ष10.    मोहम्म्द इक्बाल मोहम्मदअली बाशे – अपक्ष11.    डॉ. रामराव तुकाराम केंद्रे – वंच‍ित बहुजन आघाडी

    अर्ज केलेल्या उमेदवारांना 6 मे 2024 पर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक