शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे रविवारी गुंफले दुसरे पुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 16:48 IST

ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफले. बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात झाली.

ठळक मुद्देरविवारी संमेलनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस पार पडला.अभ्यासपुर्ण सादरीकरण, व्याख्यानाने रंगले सत्र डॉ. दीपक आपटे यांचे अमुर फाल्कनच्या संवर्धनाविषयी सादरीकरण

ठाणे : होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे आयोजित पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. रविवारी संमेलनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस पार पडला. अभ्यासपुर्ण सादरीकरण, व्याख्यानाने हे सत्र रंगले होते.       सुरूवातीला बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे  यांनी अमुर फाल्कन या ससाणाच्या जातीच्या संवर्धनाविषयी सादरीकरण केले. सुरूवातीला नागालँड येथे अमुर फाल्कनची केली जाणारी शिकार आणि त्यानंतर स्थानिकांमध्ये करण्यात आलेल्या जागृतीमुळे त्या ठिकाणी थांबलेली शिकार ही सर्व माहिती त्यांनी उदाहरणासह सादरीकरणात दिली. त्यानंतर काही पक्षीमित्रांनी यासंदर्भात त्यांना काही प्रश्न विचारुन आपल्या शंकांचे निरसन केले. विंडो बर्डिंग या विषयावर ठाण्यातील सीमा राजशिर्के यांनी सादरीकरण केले. आपल्या घरातील खिडकीतून त्यांनी टिपलेल्या पक्ष्यांचे छायाचित्र, त्यांची माहिती, त्यांचा स्वभाव, त्यांची नावे त्यांनी सादरीकरणातून दाखविली. डोंबिवलीत सुरू झालेल्या बर्ड रेस या विषयावर प्रथमेश देसाई याने सादरीकरण केले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील पक्षीमित्रांचा मिळणारा सहभाग याविषयी त्याने सांगितले. रविंद्र साठे यांनी ठाणे पक्षी गणनावर सादरीकरण केले. ठाण्यात पक्षी गणनेला झालेली सुरूवात, कोणत्या ठिकाणी केली जाते, किती गटांत केली जाते याची माहिती सादरीकरणातून पक्षीमित्रांना पाहायला मिळाली. त्यानंतर नेचर कन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिकच्या प्रतिनीधी प्रतिक्षा कोथुळे हिने सादरीकरण केले. डॉ. सुधाकर कुºहाडे यांनी अहमदनगरमधील पक्षी आणि त्यांचे संवर्धन याविषयी माहिती दिली. यात त्यांनी अहमदनगर येथे सुरू झालेल्या ‘चला पक्षी पाहु या’ या स्तुत्य उपक्रमाची माहिती सांगितली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रenvironmentवातावरण