शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३१ दिवसांत रुग्णसंख्या ६0४!, रुग्णसंख्या ६१५, आतापर्यंत १९ रुग्ण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:06 IST

२४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पंकज रोडेकर ठाणे : जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात आढळल्यानंतर शनिवार, २५ एप्रिलपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६१५ झाली आहे. २४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.२ एप्रिल रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात २४ रुग्ण सापडले होते. या कालावधीत सहा दिवस असे आहेत, की त्यादिवशी तब्बल ४0 ते ४६ रुग्ण सापडले आहेत. उल्हासनगर येथे सापडलेल्या पहिल्या रुग्णानंतर दुसरा रुग्ण आढळून येण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पहिला रुग्ण सापडल्यावर एक महिन्यानंतर भिवंडीत पहिला रुग्ण मिळाला.ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांसह दोन नगरपालिका व ग्रामीण भागात आतापर्यंत १२ हजार १६६ संशयित रुग्ण मिळाले. त्यापैकी सात हजार ९९४ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांमध्ये एक हजार २१0 संशयितांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा आणि जे.जे. रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतही पाठवण्यात आले होते. त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यापैकी आतापर्यंत १९ रुग्ण दगावले असले तरी, १२८ जणांनी या कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत.जिल्ह्यात पहिला रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. त्यानंतर १२ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण ठामपामध्ये सापडला नव्हता. तेराव्या दिवसांपासून दहापेक्षा कमी रुग्ण दररोज सापडायला सुरुवात झाली. मात्र १३ एप्रिलला एकाच दिवशी २३ रुग्ण वाढले. तेव्हापासून रुग्णांची संख्या शून्यावर येऊ शकली नाही. रुग्णांचा आलेख वाढत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत २५ एप्रिलपर्यंत २0९ रुग्ण मिळाले.कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्च रोजी मिळाला. केडीएमसीने १८ एप्रिल रोजी, तर नवी मुंबईने २ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. या दोन्ही महापालिकांनी रुग्णांचे शतक एकापाठोपाठ पूर्ण केले आहे. मीरा-भार्इंदर येथे पहिला रुग्ण २९ मार्च रोजी मिळाला. या महानगरपालिकेने १३ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. अल्प कालावधीत या पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक गाठले. अंबरनाथ आणि बदलापूर येथे ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी प्रत्येकी एकेक रुग्ण आढळला होता. सद्य:स्थितीत अंबरनाथ येथे एकूण चार तर बदलापूरमध्ये रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे.ठाणे ग्रामीणमध्ये २५ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत १७ रुग्ण सापडले आहे. उल्हासनगर येथे पहिला रुग्ण १९ मार्च रोजी सापडला असला तरी, दुसरा रुग्ण तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे २३ एप्रिल रोजी आढळून आला. सुरुवातीच्या महिनाभरात एकही रुग्ण न सापडणाऱ्या भिवंडीत १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत येथील एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.>जिल्ह्यात १३ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून २५ एप्रिलपर्यंत सहा दिवस असे आहेत की, त्यादिवशी जिल्ह्यातएकही रुग्ण सापडलेला नाही.उर्वरित दिवसांमध्ये एक किंवा दोन रुग्ण मिळालेले पाचदिवस आहेत. एका दिवशी तीन, तर दोन दिवशी चार आणिपाच रुग्ण मिळाले.६, ७,८ आणि ९ रुग्ण मिळालेले प्रत्येकी एकेक दिवस आहेत. दोन दिवस आहेत, ज्यावेळी प्रत्येकी १२ आणि १३ रुग्णमिळाले होते.एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण मिळण्याचे प्रमाण ४0 ते ४६ आहे. एवढे रुग्ण मिळणारे गेल्या ३१ दिवसांत असे सहा दिवस असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या