१५ हजार दिवेकर जाणार अनारोग्याच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:32 AM2019-11-19T00:32:34+5:302019-11-19T00:32:43+5:30

बेकायदा डम्पिंग अधिकृत करणार; हरितपट्ट्याचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली

3 thousand lamps will go to the unemployed | १५ हजार दिवेकर जाणार अनारोग्याच्या खाईत

१५ हजार दिवेकर जाणार अनारोग्याच्या खाईत

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड आता अधिकृत करण्याच्या हालचाली सुरूकेल्या असून त्यासंदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. या डम्पिंगमुळे येथील १५ हजार रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच येथील रहिवास आणि हरितक्षेत्र बदलण्याचा घाट या माध्यमातून घातला आहे.

महापालिका सध्या दिव्यातील खाजगी जागेवर शहरातील ७५० मेट्रिक टन कचरा टाकत आहे. यामुळे पसरणाºया दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण झाले आहे. याशिवाय, येथील कचºयाला वारंवार आगी लागत असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे ते हटविण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलनेदेखील झाली आहेत. विशेष म्हणजे ते बंद करण्याचे आश्वासनही पालिकेने अनेकवेळा दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यातही प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न गाजत आहे. परंतु, ते बंद करण्याऐवजी आता अधिकृत करण्याच्या पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. डावले, देसाई, साबे आणि दिवा या भागातील भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाचा प्रस्ताव महासभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या नाहीतर आयुक्तांच्या स्तरावर निर्णय घेऊन प्रस्ताव शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यास आयुक्तांना प्राधिकृत करण्यास मान्यता मिळावी, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. याचाच अर्थ नागरिकांनी विरोध केला तरी या भागात डम्पिंग होणार हे आता पालिकेनेच निश्चित केले आहे.

प्राणवायू देणाºया हरितपट्ट्यावर टाकणार कचरा
डावले येथील सर्व्हे क्र मांक २११, २१२, देसाई येथील सर्व्हे क्र मांक २२३, २२४ आणि दिवा येथील सर्व्हे क्र मांक ७९ येथील भूखंडावर हरित विभाग असे आरक्षण आहे. साबे येथील सर्व्हे क्र मांक ३७, ५७, ५८, ५९, ६०, ७२ या भूखंडांवर हरित विभाग असे आरक्षण आहे, तर साबे येथील सर्व्हे क्र मांक ३८, ६१ या भूखंडावर रहिवास आणि हरित विभाग असे आरक्षण आहे.
सद्य:स्थितीत या भूखंडांवर डम्पिंग असून त्याठिकाणी शहराचा कचरा टाकण्यात येतो. त्याची विल्हेवाट जैविक पद्धतीने शास्त्रीयदृष्ट्या पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रशासनाने या भूखंडावर आता घनकचरा व्यवस्थापन असे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मंगळवारी होणाºया महासभेपुढे तो मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यास स्थानिकांनी विरोध केला असून त्यासाठी महापालिकेकडे निवेदन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 3 thousand lamps will go to the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा