कोसबाड अपघातात २९ प्रवासी जखमी
By Admin | Updated: May 14, 2016 00:41 IST2016-05-14T00:41:00+5:302016-05-14T00:41:00+5:30
डहाणूहून बोर्डीच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४८,एजी-२१०५ या वाहनाला शुक्र वार सकाळी साडेदाहाच्या सुमारास कोसबाड येथे अपघात घडून २९ प्रवासी जखमी झाले.

कोसबाड अपघातात २९ प्रवासी जखमी
डहाणू/बोर्डी : डहाणूहून बोर्डीच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४८,एजी-२१०५ या वाहनाला शुक्र वार सकाळी साडेदाहाच्या सुमारास कोसबाड येथे अपघात घडून २९ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये २६ अल्पवयीन मुलांसह, अन्य तिघांचा समावेश आहे. जखमींना आगर येथील उप जिल्हा रु ग्णालयात दाखल केल्यानंतर त्यापैकि गंभीर जखमींना अधिक उपचाराकरिता गुजरातच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर तालुक्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलीस यंत्रणांनी कडक धोरण अवलंबिण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
डहाणूतील आशागड, सरावली, सावटा या गावातील मुलांना बोबोर्डी येथील कार्यक्र मासाठी घेवून जाणाऱ्या या खाजगी मालवाहक वाहनाला शुक्र वार, कोसबाड येथे अपघात घडला.
खाजगी वाहनातून जखमींना आगर येथील उप जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये २९ जखमी असून, अठरा वर्षाखालील ११ मुले व १५ मुलींचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संजय पराड यांनी दिली. त्यापैकी गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी गुजरातच्या रु ग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईकांनी
रुग्णालयात गर्दी केली होती. त्यावेळी काही युवकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता (वार्ताहर)