त्या २७ गावांत शिवसेनेचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
By Admin | Updated: October 27, 2015 00:11 IST2015-10-27T00:11:42+5:302015-10-27T00:11:42+5:30
२७ गावांत संघर्ष समितीच्या सभांना भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहून प्रचार करीत असताना शिवसेनेने मात्र या भागात एकही जाहीर सभा न घेता गनिमी

त्या २७ गावांत शिवसेनेचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
चिकणघर : २७ गावांत संघर्ष समितीच्या सभांना भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहून प्रचार करीत असताना शिवसेनेने मात्र या भागात एकही जाहीर सभा न घेता गनिमी काव्याप्रमाणे डोअर टू डोअर प्रचार सुरू केला आहे. काहीच गाजावाजा न करता हा प्रचार पद्धतशीरपणे सुरू आहे.
स्वत: पालकमंत्री प्रचारात लक्ष घालत असून
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्तेही कामाला
लागले आहेत. २७ गावे संघर्ष समितीचा बहिष्कार शिवसेनेने फोडला. याची जाण अद्याप समितीला नाही. समितीचा गाफीलपणाच त्यांना भोवला. लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो, याचीच प्रचीती शिवसेनेने आणून दिली. पक्षाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असल्याने समितीच्या म्हणण्याप्रमाणे २७ गावांत त्यांना एकतर्फी जागा मिळतील. मात्र, जसा निवडणुकीचा अंतिम दिवस जवळ येत आहे, तसा प्रचारात रंग चढत असून शिवसेनेचा डोअर टू डोअर प्रचार चांगल्यापैकी सुरू असल्याने हा सामना एकतर्फी नसून शिवसेना-समिती असाच रंगू लागल्याने शिवसेना गाफील नाही, हे स्पष्ट आहे. (वार्ताहर)