ठाण्यात २५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; दिवसभरात ७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 19:28 IST2021-08-11T19:28:49+5:302021-08-11T19:28:54+5:30
ठाणे शहर परिसरात ५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३६ हजार ३२८ झाली आहे.

ठाण्यात २५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; दिवसभरात ७ जणांचा मृत्यू
ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी २५३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ४७ हजार ४०८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ११ हजार १५० झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३६ हजार ३२८ झाली आहे. शहरात मृत्यूंची नोंद नाही. तर कल्याण - डोंबिवलीत ५८ रुग्णांची वाढ झाली असून १ मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत ४७ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये ८ रुग्ण सापडले असून १ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ० बाधीत असून मृत्यूची नोंद नाही.
मीरा भाईंदरमध्ये २६ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये २४ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये २० नवे रुग्ण वाढले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत रुग्णसंख्या ४० हजार ५८८ झाली आहे. आतापर्यंत १२०९ मृत्यूंची नोंद आहे.