शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

पिण्याच्या पाण्यासाठी २५० कुटुंबाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:42 AM

शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे

भिवंडी : शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे. मात्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.अंबिकानगर, संगमपाडा, इदगारोड, भारत नगर, डगलपाडा, आझमीनगर, समरूबाग व खाडीपार भागातील सुमारे २५० कुटुंबांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नाही. या भागात बहुतांश यंत्रमाग कामगार असून वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील सुमारे २५० कुटुंबातील सदस्य सायकल, टेम्पो किंवा दुचाकीवर प्लास्टिकचे १० लिटरचे कॅन घेऊन शहरातील बांगडगल्ली परिसरांत रात्रीच्यावेळी येतात. रोज ६०० ते ७०० प्लास्टिकच्या कॅनमधून पिण्याचे पाणी वाहून घेऊन जातात. हा प्रकार तीन वर्षापासून सुरू आहे. रात्री दहा ते अडीचपर्यंत या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.तीन वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी खाडीपार भागातून एक मजूर या भागात आला असता बांगड गल्लीतील शकील हबीबुल्ला यांनी आपल्या इमारतीच्या नळातून प्लास्टिकचा कॅन भरून दिला. तो नियमित कॅन भरून घेऊन जाऊ लागला. आपल्याकडे आलेल्या सर्वांना प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरून देण्यास शकील यांनी सुरूवात केली. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या बाबत खाडीपार येथील सायकलवरून पाणी वाहून नेणाऱ्या कामगारास विचारले असता तो म्हणाला की, आमच्या भागातील नेते गरीबांकडे लक्ष देत नाही. आम्ही यंत्रमागावर तर कधी मोलमजुरी करून कुटुंब पोसतो.