शाळांवर २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

By Admin | Updated: February 24, 2016 01:07 IST2016-02-24T01:07:28+5:302016-02-24T01:07:28+5:30

ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थींनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आणि शाळा इमारतींना संरक्षक भिंत उभारणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल

250 CCTV Cameras Watch on Schools | शाळांवर २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

शाळांवर २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थींनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आणि
शाळा इमारतींना संरक्षक भिंत उभारणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तब्बल १ कोटींची तरतूद केली आहे.
मीरा भार्इंदर महापालिका हद्दीत
एका खाजगी शाळेत शिक्षकाकडून घडलेल्या कृत्यानंतर सर्वच
शाळांची सुरक्षा महत्त्वाची ठरली आहे.
काही खाजगी शाळांनी त्यानुसार पावलेदेखील उचलेली आहेत. परंतु आता पालिकेच्या ८० शाळांच्या इमारती असून येथे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इंग्रजी माध्यमाच्या अशा एकूण १२१ शाळा असून त्यामध्ये ३४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये १५ हजाराहून अधिक मुलींची संख्या आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 250 CCTV Cameras Watch on Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.