शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25 टक्के राखीव, प्रवेशाचे 30 कोटींचे अनुदान रखडलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 18:02 IST

कल्याण- विनाअनुदानित खासगी शाळांनी राईट टू एज्युकेशन कायद्यान्वये 25 टक्के प्रवेश गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिले जातात. या विद्यार्थ्यांची फी सरकारकडून दिली जाते.

कल्याण- विनाअनुदानित खासगी शाळांनी राईट टू एज्युकेशन कायद्यान्वये 25 टक्के प्रवेश गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिले जातात. या विद्यार्थ्यांची फी सरकारकडून दिली जाते. गेल्या पाच वर्षात जवळपास 300 कोटी रुपये खासगी शाळांना सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे खासगी शाळा राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25 टक्के राखीव प्रवेश देणे बंद करणार असल्याचा इशारा विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या आत ही रक्कम सरकारकडून दिली जावी, अशी मागणी या शाळांकडून करण्यात आली आहे.याबाबत कल्याणातील साकेत महाविद्यालयात राज्याच्या विनाअनुदानित शाळांच्या फेडरेशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश सिंग, माजी अध्यक्ष भरत मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते. सरकारच्या जाचक अटींमुळे राज्यभरातील सुमारे सात हजार खासगी शाळा बंद पडल्या आहेत.

राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शाळांना मैदाने, स्टेज, वर्ग खोल्या, जागा ,कँटीनबाबत काही जाचक अटी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील  छोट्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. कायद्यामधील अशा काही जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात व शिक्षणाचा दर्जा उंचावेल अशा अटींचा समावेश करावा व ग्रामीण भागातील शाळांना जीवनदान द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने सरकारकडे करण्यात येणार आहे. हा कायदा 2012 पासून लागू करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत प्रवेशाचा परतावा शाळांना मिळालेला नाही. या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली.

टॅग्स :Studentविद्यार्थीkalyanकल्याण