शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२५ पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ठरल्या अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:58 IST

जिल्ह्यातील चार वर्षांची आकडेवारी । प्रत्येकी ६० हजारांची नुकसानभरपाई

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम गावखेड्यांमध्ये कुटुंब नियोजन योजनेंतर्गत गेल्या चार वर्षांत केलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी २५ पुरुषांची नसबंदी अयशस्वी ठरल्याची माहिती उघडकीस आली आहे. या पुरुषांना केंद्र आणि राज्य शासनाकडून ६० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी राज्यसभेत शिवसेनेकडून काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत, त्यांच्या सर्व सवलती रद्द करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.

पुरुषांची नसबंदी करणे, हादेखील एक महत्त्वाचा उपाय असला तरी, लोकसंख्येस आळा घालण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या चार वर्षांत २६ पुरुषांवरील शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या. त्यापैकी २५ जणांच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या होऊन त्या अयशस्वी ठरल्या, तर एकाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांनी सांगितले. या काळात किती पुरुषांच्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांना विचारणा केली असता, तशी सविस्तर माहिती सांगणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यामुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.ज्या पुरुषांच्या या शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या, त्यांना केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये व राज्य शासनाकडून ३० हजार रुपये देण्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत मंगळवारी चर्चा झाली.२६ पुरुषांपैकी २०१६ साली सात जणांच्या शस्त्रक्रिया अपयशी ठरल्या. याशिवाय, याच वर्षी एकाचा मृत्यू झाला. २०१७ साली सात जणांच्या शस्त्रक्रियांमध्ये गुंतागुंत होऊन त्या अयशस्वी ठरल्या.२०१८ मध्येही सात जणांच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या होऊन त्या अयशस्वी ठरल्या. याशिवाय, २०१९ साली चार शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेसाठी जिकिरीचे ठरू लागले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेHealthआरोग्य