भिवंडीत उभारणार २५ फूट गुढी
By Admin | Updated: March 25, 2017 01:17 IST2017-03-25T01:17:28+5:302017-03-25T01:17:28+5:30
भिवंडीत यंदाही गुढीपाडव्यानिमित्त संत नामदेव शिंपी समाज युवा मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

भिवंडीत उभारणार २५ फूट गुढी
वज्रेश्वरी : भिवंडीत यंदाही गुढीपाडव्यानिमित्त संत नामदेव शिंपी समाज युवा मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यंदा २५ फूट उंच गुढी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संत नामदेव शिंपी समाज युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बाजारपेठ येथील संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर येथे सकाळी ७ वाजता महापौर तुषार चौधरी, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे, उपायुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी २५ फूट गुढी उभारण्यात येणार आहे.
राष्ट्रीय एकात्मता, पाणीबचत, बेटी बचाव, महास्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्त भिवंडी अशा विषयांवर संदेश देण्यात येणार आहेत. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व ब्राह्मण आळी येथील टिळक चौक मित्र मंडळ, संस्कार भारती व भादवड येथेही शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. यात नागरिक, विद्यार्थी, महिला पारंपारिक वेषात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)