शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

24 तासांत पोलिसांनी लावला रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा, मैत्रिणीची छेड काढल्याने केली होती हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 20:53 IST

कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे  शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली.

डोंबिवली : कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे  शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर या हत्येचा मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली. सीताराम हा अर्षदच्या मैत्रिणीला छेडायचा, त्यामुळे संतापलेल्या अर्षदने सीतारामची हत्या केल्याची कबुली अर्षदने दिली आहे. तसेच सीतारामची हत्या केल्यानंतर अर्षदने सीतारामच्या घरात चोरी केल्याचे त्याने सांगितले.

शुक्रवारी सकाळी पिसवली येथे राहणारा सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह कल्याण नजीक असलेल्या आडीवली येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसानी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. तपासात सीताराम यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत मारेक-यांचा शोध सुरू केला. यावेळी सीताराम यांचा नांदीवली येथे राहणारा मित्र पप्पू उर्फ अर्षद खान याचे त्याच्या घरी येणेजाणे असल्याची माहिती मिळाली. याआधारे पोलिसानी अर्षदला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने हत्येची कबुली देत सीताराम आपल्या मैत्रिणीची छेड काढत होता. अनेकदा समज देऊनही त्याने हा प्रकार सुरू ठेवल्याने अखेर गुरुवारी रात्री त्याला आडिवली येथे बोलवून लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्याची हत्या केल्याची, तसेच त्याची हत्या केल्यानंतर त्याच्या घरात चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी अर्षदला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस