शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

By सुरेश लोखंडे | Updated: May 6, 2024 22:15 IST

ठाण्यात एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे

सुरेश लोखंडे, ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्‍याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यत संभाजी जगन्नाथ जाधव या एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 24 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही दि. 3 मे 2024 पर्यत होती, तर छाननी दि. 4 मे 2024 रोजी पार पडली. छाननी प्रक्रियेत 11 उमेदवार अवैध ठरले, तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज हे वैध ठरले होते. वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार संभाजी जगन्नाथ जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे.

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. ‍चिन्हवाटपाची संपूर्ण प्रक्रिया 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांचे चिन्ह जाहीर केले व अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे चिन्ह

1.         नरेश गणपत म्हस्के - शिवसेना - धनुष्यबाण (एकूण 4 अर्ज)2.         राजन बाबूराव विचारे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मशाल (एकूण 4अर्ज )3.         संतोष भिकाजी भालेराव - बहुजन समाज पार्टी - हत्ती4.        उत्तम किसनराव तिरपुडे - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) - फळांची टोपली5.         सुभाषचंद्र झा - सरदार वल्लभभाई पटेल पार्टी - माईक6.         भवरलाल खेतमल मेहता - हिंदू समाज पार्टी - ऑटो रिक्षा7.         मुकेश कैलासनाथ तिवारी - भीम सेना - गॅस सिलेंडर8.         राजेंद्र रामचंद्र संखे - भारतीय जवान किसान पार्टी - भेटवस्तू9.         राहूल जगबीरसिंघ मेहरोलिया - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी - नागरिक10.       विजय ज्ञानोबा घाटे - रिपब्लिकन बहुजन सेना - शिट्टी11.        सलिमा मुक्तार वसानी - बहुजन महापार्टी - बॅट12.       अर्चना ‍दिनकर गायकवाड - अपक्ष - किटली13.       इरफान इब्राहिम शेख - अपक्ष - हिरा14.       खाजासाब रसुलसाब मुल्ला - अपक्ष - अंगठी15.       अँड. गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी - अपक्ष - बॅटरी टॉर्च16.       चंद्रकांत विठ्ठल सोनावणे - अपक्ष - खाट17.       डॉ.पियूष के. सक्सेना - अपक्ष - बासरी18.       प्रमोद आनंदराव धुमाळ - अपक्ष - स्टेथस्कोप19.       मल्लिकार्जुन सायबन्न्ना पुजारी - अपक्ष - सफरचंद (एकूण दोन अर्ज)20.       राजीव कोंडिंबा भोसले - अपक्ष - तुतारी21.       सिध्दांत छबन शिरसाट - अपक्ष - टिव्ही रिमोट22.       दत्तात्रय सिताराम सावळे - अपक्ष - रोडरोलर23.       सुरेंद्रकुमार के. जैन - अपक्ष - फोन चार्जर24.      संजय मनोहर मोरे - अपक्ष - जेवणाचे ताट

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thane-pcठाणेrajan vichareराजन विचारेnaresh mhaskeनरेश म्हस्केbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४