माघारीच्या दिवशी २३ सदस्य बिनविरोध
By Admin | Updated: March 1, 2016 01:59 IST2016-03-01T01:59:03+5:302016-03-01T01:59:03+5:30
पालघर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) एकूण ३२ जागासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद क्षेत्रामधून होणाऱ्या निवडणुकीकरीता सोमवारी माघारीच्या शेवटच्या

माघारीच्या दिवशी २३ सदस्य बिनविरोध
हितेन नाईक, पालघर
पालघर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) एकूण ३२ जागासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद क्षेत्रामधून होणाऱ्या निवडणुकीकरीता सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी २३ जागा बिनविरोध झाल्या असून आता ८ मार्च रोजी फक्त ९ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये निवडणुका रंगणार आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत कमळाकर दळवी - वांदीवली (पालघर), काशिनाथ चौधरी - मोडगाव (डहाणू), दिलीप गोटे - वशाळा (मोखाडा), अशोक भोये - देहरे (जव्हार), विजय खरपडे - बोर्डी (डहाणू), प्रकाश निकम - वाशाळा (जव्हार) अशा सहा उमेदवारांमध्ये निवडणुक रंगणार आहे.
नगरपालिका क्षेत्रातील सर्वसाधारण एका जागेसाठी शिवसेनेचे नगरसेवक अतुल पाठक विरूद्ध राष्ट्रवादीचे नगरसेवक मकरंद पाटील यांच्यात लढत होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातून सर्वसाधारण प्रवर्गाच्या ३ जागासाठी लॉरेन डायस (वसई), उमेश नाईक (विरार), धनंजय गावडे (तुळींज), हार्दिक राऊत (विरार), असे ४ अर्ज असल्याने या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
जिल्हापरिषदेच्या अनुसूचित जमाती क्षेत्रात गीता धामोडे - कुर्झे (तलासरी), प्रमिला काकड - खडकी (विक्रमगड), सुरेखा मलावत - धानिवरी (डहाणू), मेरी रावत्या - खुबाळे (डहाणू), कौशिका डोंबरे - सावरोली (तलासरी), वैष्णवी रहाणे - भोपोली ( विक्रमगड) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सर्वसाधारण एका जागेसाठी दामोदर पिल्या पाटील, जलसार (पालघर) व सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या १ जागेसाठी चित्रा केणी तसेच नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या २ जागासाठी योगेश पाटील - मायखोप (पालघर) व निलेश गंधे (वाडा) व नागरीकांच्या मागासप्रवर्गासाठी महिलांच्या ३ जागासाठी धनश्री चौधरी - कुडूस (वाडा,) रंजना संखे - बोईसर (पालघर) व भावना विचारे - मान बोईसर (पालघर) या सर्व उमेदवारांमध्ये राजकीय पातळीवरून समझोता झाल्याने या १३ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.