भाईंदरमध्ये २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

By धीरज परब | Updated: March 12, 2024 18:45 IST2024-03-12T18:44:42+5:302024-03-12T18:45:52+5:30

भाईंदर पश्चिमेच्या बेकरी गल्लीत जय यशश्री इमारतीत लक्ष्मी हिरासिंग शेरे ही २२ वर्षांची तरुणी ९ मार्च रोजी दुपारी महाविद्यालयातून सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घरी आली.

22-year-old student commits suicide in Bhayandar | भाईंदरमध्ये २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

भाईंदरमध्ये २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाईंदर पश्चिमेच्या बेकरी गल्लीत जय यशश्री इमारतीत लक्ष्मी हिरासिंग शेरे ही २२ वर्षांची तरुणी ९ मार्च रोजी दुपारी महाविद्यालयातून सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घरी आली. बेडरूममध्ये जाऊन सिलिंग फॅनला तिने गळफास घेतल्याचे घरातील कुटुंबियांच्या निदर्शनास आले.

नजीकच्या खासगी श्रद्धा रुग्णालयात नेले असता तेथून त्यांना भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले . रात्री साडेआठच्या सुमारास तेथील डॉक्टरांनी आधीच तिचा मृत्यू झाला असल्याचे तपासून सांगितले. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार शंकर वाघकरत आहेत. आत्म्हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही . 

Web Title: 22-year-old student commits suicide in Bhayandar