जिल्ह्यातील २२ गावांना चक्रीवादळाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:09 AM2020-06-03T00:09:37+5:302020-06-03T00:19:58+5:30

२१ हजार लोकांना इशारा : मच्छीमार बोटींच्या सुरक्षेच्या कामात व्यस्त; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद

22 villages in the district at risk of cyclone | जिल्ह्यातील २२ गावांना चक्रीवादळाचा धोका

जिल्ह्यातील २२ गावांना चक्रीवादळाचा धोका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर ‘निसर्ग’ या चक्रीवादळात झाले असल्याने जिल्ह्यातील २२ गावांना धोका होण्याची भीती व्यक्त केली जात असून या गावांतील तब्बल २१ हजार लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, ११० किलोमीटर्सच्या किनारपट्टीवरील गावात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या वादळाच्या इशाºयादरम्यान मच्छीमार मात्र आपल्या बोटींची व साहित्याची सुरक्षितता या कामात व्यग्र असल्याचे दिसून आले

.
अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ श्रीवर्धन, मुंबई,पालघरच्या किनारपट्टीवर धडकून पुढे गुजरातच्या दिशेने ९० ते १०० प्रती तास वेगाने वाहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीवर सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील २२ गावे बाधित होण्याची शक्यता असून २१ हजार ०८० लोकांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


वसई तालुक्यातील चांदीप, पाचूबंदर, सायवन, कामन, ससूनवघर, अर्नाळा, अनार्ळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगाव बुद्रुक अशी १३ गावे बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर पालघर तालुक्यातील सातपाटी, जलसारंग (केळवे), मुरबे, उच्छेळी, दांडी, डहाणू तालुक्यातील डहाणू, नरपड, आंबेवाडी, चिखले तर तलासरी तालुक्यातील झाई अशी २२ गावे बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


बुधवार सकाळपासूनच्या बदलत्या वातावरणाच्या शक्यतेची जिल्हा प्रशासनाला काळजी असून जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफच्या दोन टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. पालघर आणि डहाणू तालुक्यात या दोन टीम कार्यरत असून त्यांनी अनेक गावांत फिरून या वादळाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाºया काळजीबाबत मार्गदर्शन केले. याबाबत ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीने सोयही करण्यात आली आहे.


डहाणूत दवंडी पिटून आवाहन
किनारपट्टीवरच्या गावात कच्च्या घरांमध्ये राहणाºया नागरिकांना निवारा केंद्रात दाखल केले जात आहे. तेथे करोनाबाबत घ्यायच्या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
५० कुटुंबीय राधाकृष्ण मंदिरात : सातपाटीमधील तुफानपाडा येथील सुमारे ५० कुटुंबियांना राधाकृष्ण मंदिरात हलविण्यात आले आहे, तर अन्य किनारपट्टीवरील काही घरातील कुटुंबीयांनी गावातील आपल्या नातेवाईकांचे घर गाठले. किनारपट्टीलगत राहणाºया गावातील अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी जाण्यास नकार देत असल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
डहाणू किनारपट्टीला धोका
डहाणू भागाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. किनाºयावर वादळपूर्व स्थिती निर्माण होत असून दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरू आहे.

मच्छीमार आपल्या कामात व्यग्र : मंगळवारी सकाळी १० वाजल्याच्या सुमारास किनारपट्टीवर जोरदार वाºयासह गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली असली तरी हे वातावरण फार वेळ टिकले नाही. संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यात मंगळवारच्या रात्रीपासून ते बुधवारी किनारपट्टीवर वादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला असला तरी १ जूनपासून
मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्याने सातपाटी, मुरबे, नवापूर, दांडी, डहाणू आदी भागातील मच्छीमार बोटीतून जाळी, फ्लोट्स आदी साहित्य उतरविण्याबरोबरच आपल्या बोटीच्या
संरक्षणासाठी तिला प्लॅस्टिकच्या आवरणात झाकण्याच्या कामाला लागल्याचे दिसून आले. मच्छीमार हा नेहमीच समुद्राच्या लाटांशी, वादळाशी झुंजत आल्याने या चक्रीवादळाच्या इशाºयाचे फारसे गांभीर्य त्यांच्या चेहºयावर दिसून येत नव्हते. त्यामुळे अनेक गावांमध्ये दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. हरातील अनेक गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाºयांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. परंतु नागरिक पदाधिकाºयांशी भांडणे करून बाहेर पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करत आहेत. स्विगी सारख्या खाद्दपदार्थ पुरविणाºयांना इमारतीमध्ये प्रवेश देण्याचा हट्ट करत असून अशांपुढे गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारीही
हतबल झाले आहेत.

Web Title: 22 villages in the district at risk of cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.