शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात २२ टक्के पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:52 IST

मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे.

ठाणे : मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे. यासाठी २१ आॅक्टोबरपासून आठवड्यातून एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.लघुपाटबंधारे विभागाने गुरुवारी पाण्याच्या स्थितीबाबत बैठक घेऊन आठवड्यात २२ टक्के पाणी कपातीचे फर्मान जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी आणि टेमघर या पाणी उचलणाºया संस्थांना काढले. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवण्याची गरज लक्षात घेऊन २२ टक्के पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आला.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल एक महिना आधी पाणी कपात लागू करावी लागली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून १४ टक्के कपात लागू केली होती. फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली. त्यानंतर तीही रद्द केली होती; पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघुपाटबंधारे विभागाने कपात लवकर सुरू केली. बैठकीतील निर्णयानुसार एमआयडीसी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. महापालिका त्यांच्या सोयीच्या दिवशी कपात लागू करण्याचा निर्णय घेणार आहे.सणांच्या काळात पाणी कपात टाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि एमआयडीसींना पाणीपुरवठा करणाºया आंध्रात सुमारे ३२४ दशलक्ष घनमीटर तर बारवीत २२४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यास अनुसरून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. कुणीही जादा पाणी उचणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबीदेखील या बैठकीत लघुपाटबंधारे विभागाने दिली.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे