शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

अयोध्या राम मंदिर उभारण्यासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या २११ किलोच्या विटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 6:16 PM

Ram Mandir News : योध्या राम मंदिराच्या उभारण्यासाठी सिंधी बांधवाकडून २११ कि.लो. चांदीच्या विटा रामजन्म भूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोपविण्यात आल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनीं दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - अयोध्या राम मंदिराच्या उभारण्यासाठी सिंधी बांधवाकडून २११ कि.लो. चांदीच्या विटा रामजन्म भूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोपविण्यात आल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनीं दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, राजेश वधारीया यांच्यासह देशातील सिंधी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 उल्हासनगरात सिंधी समाजाची संख्यां मोठी असून देशभरातील सिंधी बांधव यांची उल्हासनगरावर श्रद्धा व विश्वास आहे. अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान देण्यासाठी देशातील सिंधी बांधवानी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या निधीतून १ किलोच्या २११ चांदीच्या विटा अयोध्या जन्मभूमी न्यासचे संस्थापक सदस्य चंपक राय यांच्याकडे दोन दिवसापूर्वी सुपूर्द केल्या. तसेच मंदिर उभारणीसाठी सिंधी समाज कधी व केंव्हाही पुढे राहणार असल्याची माहिती कुमार आयलानी यांनीं दिली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, भाजपा नगरसेवक राजेश वधारीया, मनोज लासी, महेश सुखरामानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, देवीदास भारवानी, विक्की लासी यांच्यासह विश्व सिंधी समागमचे सुहिरा सिंधी, देशातून आलेले सिंधी समाजाचे संत महात्मा, राजकीय नेते आदिजन उपस्थित होते. 

शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्याचे रामलल्ला मंदिर व राम मंदिर बनविणाऱ्या कार्यशाळेला, हनुमानगडी, सरयू नदी आदींचे दर्शन घेतले. शहरातील बहुतांश सिंधी समाज उधोगशील असून मुंबई, दिल्ली, पुणे आदीसह देशभरात उधोगधंद्यांसाठी गेला. बहुसंख्येने सिंधी समाजाकडून सर्वाधिक मदतीची अपेक्षा असतांना, आमदार कुमार आयलानी यांनी शहरातून फक्त २११ पैकी २ चांदीच्या विटा नेल्याचा आरोप शहर भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केल्याने, भाजपातील व सिंधी समाजातील वाद यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. देशातील नव्हेतर जगातील सिंधी समाज उल्हासनगरकडे वेगळ्या नजरेने बघत असून कुमार आयलानी यांनी आततायीपणा स्वभावामुळे शहरातील सिंधी समाजाचे नाव बदनाम केल्याचा आरोप त्यांनी केला. 

सिंधी समाजाकडून मोठी मदत जाणार? देशात नव्हेतर जगात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरात राहतो. राम मंदिर उभारण्यासाठी मोठी मदत देण्यासाठी भविष्यात मोठा कार्यक्रम राबविण्याचे संकेत भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केला. शहरातून मोठी मदत देण्याचा प्रयत्न सिंधी बांधवाचे मदतीने देणार असल्याची शक्यता रामचंदानी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरulhasnagarउल्हासनगर