ठाण्यात २१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर दिवसभरात १० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 21:37 IST2021-08-10T21:36:08+5:302021-08-10T21:37:08+5:30

उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण वाढ असून दोन मृत्यू झाले. भिवंडी परिसरात दोन रुग्ण आणि मृत्यू नाही.

210 new corona cases were reported in thane, while 10 people died during the day | ठाण्यात २१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर दिवसभरात १० जणांचा मृत्यू

ठाण्यात २१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर दिवसभरात १० जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका गावपातळीवर २१० कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या २४ तासात १० जणांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. ठाणे शहरात ३४ रुग्णांच्या वाढीसह आज मात्र एकही मृत्यू नाही. कल्याण डोंबिवलीला ३१ रुग्ण वाढी, दोन मृत्यू झाले.

उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण वाढ असून दोन मृत्यू झाले. भिवंडी परिसरात दोन रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला २६ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू  नाही. अंबरनाला १२ रुग्ण वाढले असून दोन मृत्यू. बदलापूरमध्ये १५ रुग्णांची आज वाढ असून एकही मृत्यू नाही. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात १० रुग्ण सापडले असून एका मृताची नोंद आहे.

Web Title: 210 new corona cases were reported in thane, while 10 people died during the day