पालिका अंदाजपत्रकात २०१ कोटींची वाढ
By Admin | Updated: February 23, 2017 05:48 IST2017-02-23T05:48:00+5:302017-02-23T05:48:00+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात स्थायी समितीने २०१ कोटी ७३ लाखांची वाढ

पालिका अंदाजपत्रकात २०१ कोटींची वाढ
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात स्थायी समितीने २०१ कोटी ७३ लाखांची वाढ सुचविली आहे. त्यावर २ मार्चच्या विशेष महासभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने उत्पन्नाच्या लेखाशीर्षकाखाली तरतूद केलेल्या काही महत्वाच्या उत्पन्न स्त्रोतांत स्थायीने वाढ सुचविली आहे. यामध्ये प्रशासनाने तरतूद केलेल्या ७६ कोटी ७३ लाख रुपये मालमत्ता करात स्थायीने २३ कोटी २७ लाखांची वाढ सुचविली आहे. कर वसुली १०० कोटींवर आणली आहे. ६ कोटी ६२ लाखांच्या बाजार करात ३८ लाखांची वाढ केली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी पालिका संबंधित कंपन्यांकडून राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार कर वसुली करते. ही वसुली कोट्यावधींच्या घरात जात असली तरी ती कागदोपत्री जेमतेम दाखविली जाते. यापोटी प्रशासनाने अंदाजपत्रकात ३१ कोटी ५० लाखांचे उत्पन्न अपेक्षित केले आहे. स्थायीने मात्र त्यात तब्बल ८ कोटी ३५ लाखांची वाढ सुचवली आहे.
विकास आकार व बांधकाम परवानगीपोटी ५० कोटी उत्पन्नात थेट २० कोटींची वाढ केली आहे. अतिरीक्त ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम सुरु होणार आहेत. त्यामुळे स्थायीने प्रशासनाच्या ६ कोटींच्या मूलभूत सुविधा शुल्कात २० कोटींची वाढ केली आहे. सध्या पालिकेने टीडीआरच्या माध्यमातून काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचा फंडा सुरु केला आहे. त्यामुळे पालिकेचा निधी खर्च होत नाही. परंतु, ज्या ठिकाणी टीडीआर देणे शक्य नाही, अशा ठिकाणी काँक्रीटीकरणासाठी पालिकेने कर्ज उचलण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)