शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

वीजबिल कमी करण्याच्या नावाखाली २६ ग्राहकांना २० लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 23:33 IST

वीजबिल कमी करू देण्याच्या नावाखाली टोरंट कंपनीच्या ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील रफिक शेख (रा. मुंब्रा, ठाणे) आणि अब्दुल्ला शेख (रा. अमृतनगर, ठाणे) या दोन म्होरक्यांना डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देम्होरक्यास अटकडायघर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वीजबिल कमी करू देण्याच्या नावाखाली टोरंट कंपनीच्या ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील रफिक शेख (रा. मुंब्रा, ठाणे) आणि अब्दुल्ला शेख (रा. अमृतनगर, ठाणे) या दोन म्होरक्यांना डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. त्यांनी अशाप्रकारे २६ ग्राहकांकडून १९ लाख ९१ हजारांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे.टोरंट पॉवर कंपनीचा डायघर भागात बिल भरणा केंद्र आहे. अलीकडच्या काळात वीजबिल भरताना एक अनोळखी व्यक्ती ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार या कंपनीने डायघर पोलिसांकडे केली होती. दिवा, साबेगाव येथे दूध डेअरीचा व्यवसाय करणारे ग्राहक कैलासचंद्र कुमावत यांच्याकडे चौकशी केली. कुमावत यांच्याकडे एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून दूध डेअरीचे ६८ हजारांचे थकीत बिल सेटलमेंट करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ३४ हजारांची रक्कम घेतली. तसेच बिलासोबत बँक ऑफ बडोदाचा ६८ हजार ४० रुपयांचा धनादेश घेतला. त्यानंतरच्या बिलामध्ये त्यांची बिलाची रक्कम कमी न होता, वाढीव बिल आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुमावत यांनी डायघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे यांच्या पथकाने अनोळखी आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रफिक आणि अब्दुल्ला या दोघांनाही ८ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली. त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.*हे आरोपी सर्वसामान्य वीजग्राहकांची थकीत बिलाची स्वत:हून माहिती काढून त्यांचे मोबाइल क्रमांक हस्तगत करतात. त्यांच्याशी संपर्क साधून ते टोरंटो कंपनीत कामाला असल्याचे भासवून बिलाची सेटलमेंट करून देण्याचे आमिष दाखवितात. त्याचआधारे फसवणूक करतात.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी