शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

भिवंडी दुर्घटनेत २० लहानग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 00:43 IST

काही कुटुंबांतील दोन ते तीन मुले दगावली : तळमजल्यावरील दलदलीत इमारतीचे दोन मजले रुतले

नितीन पंडित।लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरातील जिलानी इमारत दुर्घटनेत दीड ते पंधरा वर्षे वयोगटातील तब्बल २० मुलामुलींचा हकनाक बळी गेला. काही माता-पित्यांनी दोन ते तीन मुले या दुर्घटनेत गमावली आहेत. आपल्या चिमुरड्यांचा मृतदेह पाहून त्यांनी फोडलेले हंबरडे काळीज पिळवटून टाकणारे होते. यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण शोकाकुल झाले होते.या दुर्घटनेत मरण पावलेल्या लहान मुलांमध्ये फातिमा बब्बू सिराज शेख (२), फुजेफा जुबेर कुरेशी (५), आकसा मोहम्मद आबिद अंसारी (१४), मोहम्मद दानिश आदिल अंसारी (११), फायजा जुबेर कुरेशी (५), आयशा कुरेशी (७), फातमा जुबेर कुरेशी (८), अफसाना अंसारी (१५), असद शाहिद खान (अडीच वर्षे), निदा आरिफ शेख (८), शबनम मोहम्मद अली शेख (१२), हसनैन आरिफ शेख (३), आरीफा मुर्तुजा खान (३), जैद जाबीर अली शेख (५), जुनैद जबीर अली शेख (दीड वर्षे), मरियम शब्बीर कुरेशी (१२), पलकबानो मो. मुर्तुजा खान (५), फराह मो. मुर्तुजा खान (६), शबाना जाबीर अली शेख (३), रिया खान (३) यांचा समावेश आहे. मध्यरात्री इमारत कोसळल्याने सर्वच लहान मुले साखरझोपेत होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने व नाकातोंडात धूळ गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या इमारतीत अनेक कामगार व मजूर परिवार परिवारासह राहत होते. तब्बल दोन ते अडीच दिवस ढिगारे उपसण्याचे काम सुरु राहिल्याने अनेक मृतदेह खराब अवस्थेत होते. त्यांची ओळख पटवण्यास विलंब लागत होता. काही कुटुंबातील जखमी सदस्य इस्पितळात उपचार घेत असल्याने मृतांची ओळख पटवण्यात अडचणी आल्या. दोन-तीन कुटुंबे या दुर्घटनेत नामशेष झाल्याने त्यांची नातलग बोलावून मृतांची ओळख पटवावी लागली. येथील रहिवासी मो. कुरेशी यांचा अडीच वर्षांचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या जिवाची घालमेल सुरु आहे. बुधवारी दुर्घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. कोरोनामुळे बघ्यांना तेथून हटवताना पोलिसांची तारांबळ उडाली होती.इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. कोरोना संकटामुळे तो पाच-सहा महिने बंद होता. इमारत धोकादायक झाल्याने तळमजल्यावरील या कारखान्यात जमिनीतून पाणी वर येऊ लागल्याने तसेच पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्याने दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले होते. इमारत कोसळल्याने पहिला व दुसरा मजला त्या दलदलीत फसला. तिसºया मजल्यावरील ढिगाºयाखाली अडकलेल्या लोकांचीजलदगतीने सुटका तरी झाली किंवा तेथील मृतदेह सहज काढणे शक्य झाले. मात्र पहिल्या व दुसºया मजल्यावरील अनेक मृतदेह त्या दलदलीत फसल्याने एकतर ते बाहेर काढण्यात अडचणी आल्या व मृतदेहांची दुर्गंधी पसरली. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पाऊस कोसळल्याने ढिगारे उपसण्याच्या कामात अनेक अडथळे आले.२५ अतिधोकादायक इमारती पाडणार : शहरातील अतिधोकादायक २५ इमारती पाडण्याचा निर्णय महापालिकेनी घेतला आहे. त्यापैकी १९ इमारतींमधील रहिवाशांना या इमारतींमधून बाहेर काढण्यात आले आहे. सहा इमारती पाडण्यात आल्या आहेत. याखेरीज १९८ इमारती गंभीर धोकादायक असून त्या रिकाम्या करुन दुरुस्त करणे गरजेचे आहे. धोकादायक इमारतींना नोटिसा दिल्यावर त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन या इमारतींना बाहेरुन किरकोळ डागडुजी करुन त्या वापरायोग्य असल्याचे प्रमाणपत्र काही स्ट्रक्चरल इंजिनीयरनी दिल्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. अशा इंजिनीयरवर कारवाई केली जाणार आहे.मृत, जखमींच्या संख्येबाबत संभ्रमच्जिलानी इमारतीच्या दुर्घटनेत ४१ मृत तर २५ जखमी झाल्याचा दावा केला जात असला, तरी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार या दुर्घटनेत ३८ जण मृत तर १९ जण जखमी झाले आहेत.च्सोमवारी रात्री दुर्घटना झाल्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी आले. ते येईपर्यंत सात जणांचे मृतदेह ढिगाºयातून बाहेर काढण्यात आले होते.च्मात्र शिंदे यांनी १० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती माध्यमांना दिल्याने, पुढील मोजदाद त्यानुसार झाली आणि तीन मृतांची तफावत झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचेअन्यत्र पुनर्वसन करणार - अस्लम शेखदरम्यान, राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली. ज्या शहरांची लोकसंख्या वाढली आहे, त्याठिकाणी अशा धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे पुनर्वसन कसे करता येईल, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून भिवंडीतील पुनर्वसनाच्या मुद्यावर मार्ग काढण्यात येईल. शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, आणखी मदत हवी असल्यास पुरवण्यात येईल, असे अस्लम शेख यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना