ठाण्यात बारबालांसह १९ जणांना अटक
By Admin | Updated: March 30, 2017 04:00 IST2017-03-30T04:00:24+5:302017-03-30T04:00:24+5:30
कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा गावातील ‘रसिला बार अॅण्ड रेस्टॉरंट’वर मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने

ठाण्यात बारबालांसह १९ जणांना अटक
डोंबिवली : कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा गावातील ‘रसिला बार अॅण्ड रेस्टॉरंट’वर मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. तेव्हा तेथे अर्धनग्न अवस्थेतील १५ बारबाला, दोन वेटर व बार व्यवस्थापकास अटक केली.
मंगळवारी रात्री या बारमध्ये आॅर्केस्ट्राच्या तालावर बारबालांचा धुडगूस सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री सव्वानऊच्या सुमारास छापा टाकला. या वेळी पोलिसांना तेथे १५ बारबाला अर्धनग्न अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी त्यांच्यासह बार व्यवस्थापक रामसेवक वर्मा (४४), वेटर दिनराज सॅलियन (४२) व शैलेंद्र शर्मा (२४) यांना अटक केली. (प्रतिनिधी)