शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

जिल्ह्यात १,८१,२५६ नागरिक कोरोनामुक्त, जलद उपचारांमुळे रुग्णांना मिळतोय दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:53 IST

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १० लाख ७१ हजार ९९५ संशयित रुग्ण आढळले. त्यातील आठ लाख ७० हजार २७८ जणांना बाधाच झालेली नाही.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेची कसोटी लागली. मात्र, योग्य उपचारांबरोबरच लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासकीय यंत्रणांनीही जीवाची पर्वा न करता नियमांचे पालन करण्याबाबत जागृती केल्याने  आतापर्यंतच्या दोन लाख ४७० रुग्णांपैकी एक लाख ८१ हजार २५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १० लाख ७१ हजार ९९५ संशयित रुग्ण आढळले. त्यातील आठ लाख ७० हजार २७८ जणांना बाधाच झालेली नाही. दरम्यान, गणेशोत्सवात काहींनी हलगर्जी केल्याने रुग्णवाढीचा आलेख उंचावला. आताही दिवसाकाठी जिल्ह्यात एक हजारावर रुग्ण सापडत आहे. आजपर्यंत पाच हजार ७० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, तत्काळ बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयातील खाटा लवकर रिकाम्या होऊन अन्य रुग्णांना वेळेत व जलद उपचार  मिळत आहेत. 

खासगी कोविड सेंटरचा दररोजचा खर्च? खासगी कोविड सेंटरचा खर्च हा त्या रुग्णालयातील एकूण बेड आणि त्यासाठी असलेले डॉक्टर यावर अवलंबून असतो. तरीपण, महिन्याला अंदाजे २० ते २५ लाखांचा खर्च महिन्याला येतो. 

 खासगी कोविड सेंटर सुरू करून उपचार केले. या रुग्णालयासाठी खिशातून खर्च केला. खर्च परवडत नसल्याने रुग्णालय १५ ऑक्टोबरला बंद केले.   - डॉ. प्रमोद पष्टे, मुरबाड

जिल्ह्यात कोविड सेंटरची परिस्थितीठाणे शहरात जिल्ह्यात सर्वाधिक खासगी आठ रुग्णालये सुरू असून कल्याण-डोंबिवली परिसरात सर्व मिळून अवघी सात रुग्णालये, भिवंडीला खासगी आठ, पाच रुग्णालये पण त्यातील खाटांच्या संख्येचा अहवाल मनपाकडे नाही. मीरा-भाईंदरला खासगी १५ रुग्णालये, तर अंबरनाथ, बदलापूरला प्रत्येकी दोन खासगी रुग्णालये सुरू आहेत. या रुग्णालयांचे आयसीयू, व्हेंटिलेटर आदींच्या उपलब्धतेची व रिकामे आहेत की सुरू आहेत आदींची माहिती स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे आढळून आले. यामुळे यामागील काय गौडबंगाल आहे, हा सध्या संशोधनाचा विषय बनला आहे.

शासकीय रुग्णालयांत उपचार काही खासगी रुग्णालयांनी उपचाराचे अव्वाच्या सव्वा बिल काढल्याच्या गंभीर घटना घडल्या. त्यामुळे सध्यातरी रुग्णांची ओढ शासकीय रुग्णालयांकडे अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश खासगी रुग्णालयांना घरघर लागली आहे. त्यांचा दैनंदिन खर्च सध्या निघत नसल्यामुळे ती बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु, जिल्ह्यातील एकही खासगी रुग्णालय रुग्णांअभावी बंद पडलेले नाही.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं